Keral News: दिल्ली,बिहारमध्ये एकहाती सत्ता मिळवल्यानंतर भाजपनं आता आपला मोर्चा हा पुढच्या वर्षी होत असलेल्या पश्चिम बंगाल, आसाम तसेच दक्षिणेकडील केरळ, तामिळनाडू या राज्यांकडे वळवला आहे. या राज्यांतील निवडणुकांमधील विजयासाठी भाजपनं जोरदार कंबर कसली आहे. पश्चिम बंगालसह केरळ तामिळनाडूमध्ये भाजपला (BJP) दणदणीत कामगिरी करता आलेली नाही. पण आता भाजपनं विधानसभा निवडणुकीपूर्वीच केरळ राज्यात मोठा धमाका केला आहे.
भाजपनं केरळमध्ये धडाक्यात एन्ट्री करतानाच डाव्यांच्या 45 वर्षांच्या सत्तेलाच सुरुंग लावला आहे. तिरुवनंतपुरम महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं शुक्रवारी (ता.26)ऐतिहासिक विजय मिळवला. महत्त्वाची बाब म्हणजे या निवडणुकीत तब्बल 51 जागा जिंकत भाजपनं डाव्यांच्या वर्चस्वाला जोरदार धक्का दिला आहे.
केरळच्या राजधानीत भाजपनं पहिल्यांदाच कमळ फुलवत महापौरपद खेचून आणलं आहे. तिरुवनंतपुरम नगरपालिका निवडणुकीत भाजपनं दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह 45 वर्षांपासून लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटच्या ताब्यात असलेला बालेकिल्ल्यालाही सुरूंग लावण्याचं काम केलं आहे. 101 सदस्य असलेल्या या महानगरपालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
भाजपनं तिरुवनंतपुरम महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत तब्बल 51 जागा जिंकल्या आहेत. सत्ताधारी एलडीएफला केवळ 29 जागा जिंकता आल्या आहेत. तिरुवनंतपुरम महानगरपालिका निवडणुकीच्या महापौरपदी भाजपचे ज्येष्ठ नेते व्ही.व्ही.राजेश यांची निवड झाली आहे.
केरळच्या (Kerala) राजकारणात भाजपने शुक्रवारी (२६ डिसेंबर २०२५) एक नवा इतिहास रचला. भाजपचे ज्येष्ठ नेते व्ही. व्ही. राजेश यांची तिरुवनंतपुरम महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड झाली असून, केरळमध्ये भाजपचा महापौर होण्याची ही पहिलीच वेळ आहे.गेल्या 45 वर्षांपासून या महापालिकेवर डाव्यांच्या (CPM) वर्चस्व राहिलं होतं.भाजपनं मिळवलेला हा दणदणीत विजय हा डाव्यांना मोठा झटका मानला जात आहे.
तिरुवनंतरपुरम च्या महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत 45 वर्षीय राजेश यांना 51 मतं मिळाली.यानंतर एका अपक्ष नगरसेवकाच्या पाठिंब्यानं भाजपनं या निवडणुकीत बहुमताचा आकडा गाठला.तर या महापौरपदाच्या निवडणुकीत सीपीआयएमच्या आर.पी.शिवाजी यांना 29, तर काँग्रेसप्रणित यूडीएफच्या के.एस.सबरीनाथन यांना १९ मतं मिळाली.
पुढील वर्षी होत असलेल्या केरळ विधानसभा निवडणुकीपूर्वी राजधानी तिरुवनंतपुरमच्या महानगरपालिकेवर कमळ फुलवत भाजपनं एकप्रकारे डाव्यांच्या गडात धडाक्यात एन्ट्री केल्याचं दिसून येत आहे. गेल्या अनेक निवडणुकांपासून भाजपला याठिकाणी यश मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.