Dhananjay Munde Letter: अमित शहांच्या भेटीनंतर धनंजय मुंडेंचं CM फडणवीसांना पत्र! 'बीडच्या विकासाची संधी हिरावून घेऊ नका' म्हणत इशारा

Latur Kalyan Expressway : लातूर–कल्याण जनकल्याण महामार्ग बीडमधूनच जावा, अशी मागणी धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली असून, अन्यथा बीडच्या विकासावर गंभीर परिणाम होईल असा इशारा दिला आहे.
NCP MLA Dhananjay Munde submits a letter to Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis, demanding the Latur–Kalyan expressway be routed through Beed district for development.
NCP MLA Dhananjay Munde submits a letter to Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis, demanding the Latur–Kalyan expressway be routed through Beed district for development.Sarkarnama
Published on
Updated on

Beed Development News : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर महायुती सरकारमधील मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाडीचे नेते धनंजय मुंडेंचं कमबॅक होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चा सुरू असतानाच त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. यानंतर त्यांनी ही भेट परळीतील विकासकामासंदर्भात असल्याचं स्पष्ट केलं. मात्र, आता त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पत्र लिहित मोठा इशारा दिला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लातूर-कल्याण या जनकल्याण द्रुतगती महामार्गाची घोषणा झाली होती. परंतु, हा मार्ग बीडऐवजी धाराशिव मार्गे करण्यास परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी विरोध दर्शवला आहे. हा मार्ग बीडमधूनच व्हावा, अशी मागणी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना पत्र लिहित केली आहे.

लातूर-कल्याण या हा जनकल्याण द्रुतगती महामार्ग बीडऐवजी धाराशिवमधून वळवण्याचा निर्णय झाल्याची चर्चा आहे. हा प्रकल्प लातूर - अंबाजोगाई - केज - जामखेड - अहिल्यानगर मार्गे कल्याण या मार्गावर राबविणे अपेक्षित आहे. मात्र हा महामार्ग बीड जिल्ह्या ऐवजी धाराशिव जिल्ह्यातून वळवण्यात येणार असल्याची चर्चा होत असल्याने हा महामार्ग अन्यत्र वळवण्यात येऊ नये, असे धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.

NCP MLA Dhananjay Munde submits a letter to Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis, demanding the Latur–Kalyan expressway be routed through Beed district for development.
Sambhaji Nagar News: महायुतीचा 'रात्रीस खेळ चाले'! भाजप अध्यक्षांच्या घरी रात्री उशीरापर्यंत बैठक, पण...

या महामार्गावर परळीचे प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग अवघ्या 15 किमी अंतरावर जोडले जाणार असून या महामार्गामुळे बीड जिल्ह्यात औद्योगिक प्रगती, दळणवळण सुलभता, शेतीमालाची वाहतूक अशा एकूणच आर्थिक उन्नतीत भर घालणारा हा प्रकल्प एक प्रभावी घटक ठरणार आहे. बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना देखील कमी वेळेत उत्पादित शेती माल मुंबई, कल्याण, पुणे सारख्या प्रमुख बाजार पेठांमध्ये पोचवणे कमी खर्चात शक्य होणार आहे.

NCP MLA Dhananjay Munde submits a letter to Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis, demanding the Latur–Kalyan expressway be routed through Beed district for development.
Maharashtra Politics: शिवसेना- मनसे युतीनंतर काहीच तासांतच राजकारण फिरलं; महाराष्ट्रात दोन मोठे पक्ष एकत्र

वाहतूक सेवेसह रोजगार निर्मिती साठी हा प्रकल्प एक मोठी संधी ठरणार आहे. हा नियोजित महामार्ग बीड जिल्ह्याऐवजी बदलून धाराशिव जिल्ह्यातून वळवण्यात यावा यासाठी प्रयत्न सुरू असून बीड जिल्ह्यातील जनतेच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असलेला हा प्रकल्प अन्यत्र वळवणे हे दुर्दैवी व बीड जिल्ह्यातील जनतेवर अन्यायकारक ठरेल.

बीड जिल्ह्यात आधीच दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, स्थलांतर, मर्यादित औद्योगिक वसाहती अशा अनेक समस्यांना आम्ही तोंड देत आहोत. त्यात या महामार्गाच्या निमित्ताने विकासाची चालून आलेली संधी हिरावून घेतल्यास जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी, व्यापारी, युवक, सामाजिक संघटना आदींच्या मनात असंतोष निर्माण होऊन प्रसंगी लोकशाही मार्गाने जनआंदोलन छेडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे जनभावना व नैसर्गिक न्यायाच्या भूमिकेतून राज्य शासनाने प्रस्तावित लातूर - कल्याण (जनकल्याण द्रुतगती महामार्ग) मूळ नियोजनाप्रमाणे बीड जिल्ह्यातूनच राबवावा, अशी विनंती या पत्राद्वारे धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com