Gujarat Assembly election, Rahul Gandhi, Narendra Modi, Arvind Kejriwal Sarkarnama
देश

मतदारांनी सगळ्यांनाच खूष केले; गुजरात भाजपला, हिमाचल काँग्रेसला अन् दिल्ली 'आप'ला

Election results : भाजप, काँग्रेस आणि आपचा वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये विजय

सरकारनामा ब्यूरो

Election results : देशातील दोन राज्यात विधानसभा आणि राजधानी दिल्लीमध्ये महापालिकेची निवडणूक झाली. यामध्ये भाजपला गुजरातमध्ये (Gujarat) ऐतिहासीक विजय मिळाला आहे. तर दुसरीकडे हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) काँग्रेसला (Congress) मोठा विजय मिळाला आहे. तसेच दिल्ली महापालिकेमध्ये आम आदमी पार्टीचा विजय झाला आहे. त्यामुळे या तीन निवणुकीमध्ये मतदारांनी कोणालाच नाराज केली नाही, याची जोरदार चर्चा रंगली आहे.

भाजपने (BJP) गुजरातमध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. विधानसभेच्या 182 जागांपैकी १५६ जागा जिंकत इतिहास रचला आहे. तर काँग्रेसची धुळधाण झाली आहे. त्यांना आतापर्यंतच्या सगळ्यात कमी 17 जागा मिळाल्या आहेत. तर आपला या निवडणुकीत पाच जागा जिंकता आल्या असल्या तरी त्यांनी 13 टक्के मते घेत राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त केला आहे.

दुसरीकडे हिमाचल प्रदेश भाजपकडून हिसकावण्यात काँग्रेसला यश मिळाले आहे. काँग्रेसला येथे 40 जागांवर स्पष्ट बहूमत मिळाले आहे. तर भाजपला 25 जागांवरच विजय मिळवता आला आहे. आपला येथे एकही जागा जिंकता आलेली नाही. गुजरातच्या लाटेत हिमचाल प्रदेशने काँग्रेसची बाजू सावरली आहे.

तर दिल्ली महापालिका निवडणुकीमध्ये आपने (AAP), भाजपची 15 वर्षांची सत्ता खाली खेचली. त्यामध्ये 250 जांगापैकी आपला 134 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर भाजपला 104 जागांवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसला मात्र, येथे फक्त 9 जागांवर यश मिळाले आहे. मात्र, या तीनही निवडणुकांमध्ये मतदारांनी कोणालाच नाराज केले नाही, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT