Assembly by-election : गुजरात, हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) विधानसभा निवडणुकीच्या सोबत देशातील सहा राज्यातील एक लोकसभा आणि सहा विधानसभा जागेवर निवडणूक झाली. त्याचा निकाल आज जाहीर झाला. गुजरातमध्ये भाजपने ऐतीहासीक विजय मिळवला आहे. तर हिमाल प्रदेश निवडणुकीत काँग्रेसने जोरदार विजय मिळवला आहे. त्या सोबत राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये झालेल्या पोट निवडणुकीत काँग्रेसने जोरदार विजय मिळवला आहे.
राजस्थानातील (Rajasthan) सरदारशहर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा (Congress) विजय झाला आहे. सत्ताधारी काँग्रेसने सरदारशहर विधानसभा जागेवर आपली पकड कायम ठेवली आहे. या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षाचे उमेदवार अनिल कुमार शर्मा 26 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. तर छत्तीसगड विधानसभा पोटनिवडणुकीत भानुप्रतापपूर मतदारसंघात काँग्रेसचा विजय झाला आहे. येथून काँग्रेसच्या उमेदवार सावित्री मांडवी विजयी झाल्या आहेत. भाजपचे (BJP) उमेदवार ब्रम्हानंद नेताम यांचा २० हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला आहे.
दुसरीकडे उत्तर प्रदेशातील मैनपुरी लोकसभा पोटनिवडणुकीत डिंपल यादव यांनी दणदणीत विजय मिळवाल आहे. मैनपुरी लोकसभा पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाच्या उमेदवार डिंपल यादव यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी रघुराज सिंह शाक्य यांचा २ लाख ८८ हजार ४६१ मतांनी पराभव केला. त्याच बरोबर ओडिशातील पोटनिवडणुकीत बीजेडीने पदमपूर जागा जिंकली आहे. ओडिशातील पदमपूर विधानसभा पोटनिवडणुकीत बीजेडीच्या वर्षा सिंह बरिहा यांचा 42 हजार 679 मतांनी विजय झाला आहे.
तसचे खतौली विधानसभा पोटनिवडणुकीत आरएलडीचे उमेदवार मदन भैय्या विजयी झाले आहेत. उत्तर प्रदेशातील खतौली विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाचे आणि राष्ट्रीय लोक दलाचे उमेदवार मदन भैय्या यांनी त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या राजकुमारी सैनी यांचा २२ हजार १४३ मतांनी पराभव केला आणि ही जागा भाजपकडून हिसकावून घेतली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.