Tripura Bypoll Result Latest Update
Tripura Bypoll Result Latest Update Sarkarnama
देश

पहिल्याच निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा दणदणीत विजय; भाजपला चारपैकी तीन जागा

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : त्रिपुरामध्ये विधानसभेच्या चार जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने (BJP) तीन जागा जिंकत बाजी मारली आहे. या निवडणुकीत नवनियुक्त मुख्यमंत्री माणिक साहा (Manik Saha) यांचाही विजय झाला आहे. तर एका जागेवर काँग्रेसच्या (Congress) उमेदवाराने विजय मिळवला आहे. (Tripura Bypoll Result Latest Update)

मागील महिन्यात त्रिपुरामध्ये विप्लव देव यांच्याजागी साहा यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकण्यात आली आहे. राज्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. पण देव यांच्याविषयी वाढत चाललेल्या नाराजीमुळे हा बदल करण्यात आला होता. साहा हे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी कायम राहण्यासाठी त्यांना या निवडणुकीत विजय मिळवणे आवश्यक होते.

साहा यांची विधानसभेची पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीत त्यांनी बोर्डोवली मतदारसंघातून 6 हजार 104 मतांनी विजय मिळवला आहे. तसेच भाजपच्या इतर दोन उमेदवारांना जुबराजनगर आणि सुरमा मतदारसंघात विजय मिळाला.

काँग्रेसने राज्याची राजधानी असलेल्या अगरतळावर कब्जा केला आहे. ही प्रतिष्ठेची जागा मानली जाते. यामध्ये काँग्रेसचे उमेदवार सुदीप रॉय बर्मन यांनी 3 हजार 163 मतांनी विजय मिळवला.

दरम्यान, देशातील तीन लोकसभा आणि सात विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे. आंध्र प्रदेशातील विधानसभेच्या एका जागेवर मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांच्या पक्षाने विजय मिळवला आहे. तर उत्तर प्रदेशातील दोन लोकसभा मतदारसंघात भाजप व समाजवादी पक्षात टक्कर सुरू आहे. पंजाबमध्येही आपला धक्का बसण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT