Gujarat Assembly Election 2022 : देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरात राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी रणनीती आखली आहे. गुजरात विधानसभेच्या आगामी निवडणुकीत भाजपकडून 25 टक्के तिकीटे नवीन चेहऱ्यांना देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे तिकीट देताना उमेदवाराची विजयी क्षमता विचारात घेतली जाईल. रविवारी संध्याकाळी वडोदरा येथे त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
तिकिटासाठी उमेदवाराची विजयी क्षमता हा एकमेव निकष आहे. पक्षाचे संसदीय मंडळ उमेदवार निश्चित करेल. पक्ष नव्या चेहऱ्यांना किमान 25 टक्के तिकीट देईल. म्हणजेच गुजरात निवडणुकीत भाजप ४५ ते ४६ नव्या चेहऱ्यांना तिकीट देऊ शकते. याबाबत बोलताना अमित शहा म्हणाले की, पक्षात इतर उमेदवारांच्या तुलनेत जिंकण्याची क्षमता असेल तर पक्ष तीन-चार वेळा निवडून आलेल्या उमेदवारांना तिकीट देऊ शकतो. राज्यात विधानसभेच्या 182 जागा आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 99 जागांवर विजय मिळवला होता.
यावेळी त्यांनी आप'बाबतही भाष्य केलं. पूर्वी पक्षांना मतांच्या वाटणीसाठी अपक्ष उमेदवार उभे करावे लागायचे, पण आता त्याची जागा आप ने घेतली आहे. अपक्ष उमेदवारांनी गांभीर्याने निवडणूक लढवली नव्हती. परंतु मतमोजणीपर्यंत आप गंभीरपणे निवडणूक लढेल.
आप' मुळे काँग्रेसच्या मतांमध्ये घसरण होईल. त्याचा भाजपला फायदा होईल. गेल्या निवडणुकीत भाजपने पाच हजारांपेक्षा कमी फरकाने सुमारे 35 जागा जिंकल्या होत्या. 2022 च्या निवडणुकीत आपच्या उपस्थितीने या 35 जागांवर भाजपचे मताधिक्य वाढेल. भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होईल. जनता भाजपला सत्तेत आणण्यासाठी मतदान करेल आणि काँग्रेस विरोधात राहील, असा विश्वासही अमित शहांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.