काँग्रेस आमदाराला 'मोदी पॅटर्न'ची भुरळ; आदिवासी गावात साजरी केली दिवाळी

Congress : आमदार पारवेंनी फटाके फोडत यंदाची दिवाळी जल्लोषात साजरी केली आहे.
Congress MLA Raju Parve Latest News
Congress MLA Raju Parve Latest NewsSarkarnama

नागपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही दरवर्षी प्रमाणे कारगिलमध्ये जाऊन भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी केली. अशीच पद्धत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुसरून गडचिरोली येथील जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

आता अशाचप्रकारे उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांनीही नागपूर येथील आदिवासी गावात जाऊन दिवाळी साजरी केली आहे. यामुळे त्यांची जोरदार चर्चा होत आहे. (Congress MLA Raju Parve Latest News)

Congress MLA Raju Parve Latest News
अतिवृष्टीग्रस्त ४७ गावांना मदत दिली नाही, भाजप पदाधिकारी संतप्त; टोकाची भूमिका घेणार...

नागपूर जिल्ह्यातील उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी नागपूर मधील बिरसा मुंडा कुही फाटा गावात मुक्काम करत काल (ता.24 ऑक्टोबर) आपली दिवाळी साजरी केली. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले. या गावात दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागतो. मात्र याच गावात आमदार पारवेंनी फटाके फोडत यंदाची दिवाळी जल्लोषात साजरी केली आहे. यावेळी पारवेंनी या गावातील आदिवासींना हक्काचे पट्टे देणार असल्याचेही आश्वासन दिल्याने अदिवाशी बांधवांनी आनंद व्यक्त केला.

Congress MLA Raju Parve Latest News
भाजपची पसमांदा मुस्लिमांना आकर्षित करण्याची मोहीम ठरली!

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दरवर्षी जवानांसोबत आपली दिवाळी साजरी करतात हीच री ओठत यंदा राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनीही गडचिरोली येथील जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आमदारांनीही तोच 'मोदी पॅटर्न' वापरत आदिवासी गावात दिवाळी साजरी केल्याने त्यांची अधिक चर्चा होत आहे. तसेच आता मोदी पॅटर्नची भुरळ काँग्रेस आमदारांनाही पडत आहे की काय? असाच प्रश्न अनेकांना पडला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com