Arvind Kejriwal, Manish Sisodia sarkarnama
देश

BJP Sting : केजरीवाल, सिसोदिया अडचणीत ; भाजपचे स्टिंग, दारू माफियांकडून कमिशन घेतले..

bjps sting on Arvind Kejriwal : भाजपने केजरीवाल सरकारच्या नव्या मद्य धोरणातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केल्याचा दावा केला आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) व उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी नव्या मद्य धोरणातून आपले उखळ पांढरे केल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपने याबाबतचा पुरावा सादर करण्यासाठी स्टिंग (bjps sting) केले. (Arvind Kejriwal latest news)

या स्टिंग व्हिडिओच्या माध्यमातून भाजपने केजरीवाल सरकारच्या नव्या मद्य धोरणातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केल्याचा दावा केला आहे. सोमवारी पत्रकार परिषद भाजपने हा स्टिंग व्हिडिओ सादर करीत केजरीवाल-सिसोदिया यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

दिल्लीत नवे मद्य धोरण लागू झाल्यानंतर केजरीवाल सरकारच्या महसुलात 27 टक्क्यांची वाढ झाली. सरकारच्या तिजोरीत 8900 कोटी रुपये आले. त्यानंतर त्यातील भष्ट्राचार झाल्याचा आरोप करीत भाजपने सरकारला धारेवर धरले आहे.

"हे स्टिंग ऑपरेशन पब्लिक डोमेनमध्ये आहे. यातून मद्य धोरणातून मोठी लूट केल्याचे स्पष्ट होते. दिल्लीच्या जनतेने आता स्वतःच निर्णय घ्यावा. सत्ताधारी आम आदमी पार्टीने अद्याप यावर कोणताही निर्णय दिला नाही. त्यांनी हा व्हिडिओ आपला नसल्याचे सांगावे," असे भाजपने म्हटलं आहे.

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, "आम्ही जे स्टिंग दाखवले आहे, त्यातून स्टिंग मास्टरचे स्टिंग झाले आहे. अरविंद केजरीवाल जेव्हा मुख्यमंत्री झाले होते, तेव्हा त्यांनी जनतेला भ्रष्टाचाऱ्यांचे स्टिंग करून त्याचा व्हिडिओ सरकारला पाठवण्याचे आवाहन केले होते. आज नव्या मद्य धोरणातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला आहे. पहिली गोष्ट ही आहे की या धोरणातील 80 टक्क्यांचा लाभ केजरीवाल व सिसोदियांनी दिल्लीच्या जनतेच्या खिशातून काढून आपल्या खिशात टाकला,"

"आम्ही केजरीवाल व सिसोदियांना 5 प्रश्न विचारले. पण एकाचेही उत्तर मिळाले नाही. त्यानंतर आम्ही स्टिंगच्या माध्यमातून त्यांचा पर्दाफाश केला. त्यांनी आपले कमिशन ठेवून घेतले. त्यानंतर ठेकेदार व आपल्या मित्रांना दिल्लीच्या जनतेची खुली लूट करण्याची परवानगी दिली. तिसरी गोष्ट त्यांनी काळ्या यादीतील कंपन्यांना बोलावून कंत्राटे दिली. चौथी गोष्ट या संपूर्ण प्रकरणात व्हाइट मनीचे काळ्या पैशांत रुपांतर करुन तो केजरीवाल व सिसोदियांना पाठवला जात होता," असा आरोप पात्रा यांनी पत्रकार परिषदेत केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT