Karnataka election 2023
Karnataka election 2023  Sarkarnama
देश

Karnataka Election: गांधींविरोधातील तक्रारीनंतर अन् मतदानाला काही तास उरले असतानाच भाजपचं मध्यरात्री 'ते' ट्विट...

सरकारनामा ब्यूरो

Karnataka Election 2023: गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांनी वादळी ठरलेला कर्नाटक विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी अखेर सोमवारी(दि.८) थंडावली. भाजप आणि काँग्रेसनं कर्नाटकातील विजयासाठी कंबर कसली आहे. याचमुळे भाजपकडून पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर काँग्रेसकडून सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेतेमंडळी प्रचारात उतरली होती.

कर्नाटक विधानसभे(Karnataka Election)च्या प्रचाराच्या तोफा थंडावण्यास काहीच अवधी बाकी असतानाच भाजपकडून सोनिया गांधी विरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आृली होती. यानंतर आणखी एक बाब उघड झाली आहे. सोनिया गांधी यांच्या विरोधातील तक्रारीनंतर भाजपकडून मंगळवारी मध्यरात्री एक ट्विट करण्यात आलं आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

कर्नाटक विधानसभेचा प्रचाराची मुदत संपली असली तरी भाजपकडून मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी नवनवीन क्लुप्त्या लढविल्या जात आहे. त्याचाच भाग म्हणून मतदानाला एक दिवस बाकी असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदीं(Narendra Modi)नी मंगळवारी रात्री १२.२१ वाजता एक व्हिडिओ ट्विट केला आहे. भाजपच्या ट्विटर हँडलवर पंतप्रधानांचा हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला

काय आहे या व्हिडीओत ?

भाजप(BJP)कडून ट्विट पंतप्रधान मोदी यांनी कर्नाटकच्या जनतेला भाजपला मत देण्याचं आवाहन केलं आहे.'कर्नाटकला एक ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्यासाठी दुहेरी इंजिन सरकारची गरज आहे असं मतही पंतप्रधान मोदी यांनी या व्हिडीओत म्हटलं आहे. तसेच 'तुमची स्वप्ने, ही माझी स्वप्ने आहे ती आपण आम्ही मिळून पूर्ण करू असंही मोदी म्हणाले आहेत.

सध्या कर्नाटकातील जनतेने डबल इंजिन सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळातील कारभार पाहिला आहे. भाजप सरकारची निर्णायक, केंद्रीत आणि भविष्यवादी धोरणे कर्नाटकच्या अर्थव्यवस्थेच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. कोरोनासारख्या महामारीनंतरही कर्नाटकातील भाजप सरकारच्या कार्यकाळात विदेशी गुंतवणूक आणि एफडी वार्षिक 90 हजार कोटी रुपयांवर आली होती, त्याचवेळी मागील सरकारच्या काळात हाच आकडा केवळ 30 हजार कोटी रुपयांच्या आसपास होता असंही मोदी यांनी व्हिडीओत म्हटलं आहे.

सोनिया गांधींविरोधात तक्रार...

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी राज्याच्या सार्वभौमत्वाचा मुद्दा मांडल्यानंतर आक्रमक झालेल्या भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. सोनिया यांनी ‘सार्वभौमत्व’ या शब्दाचा जाणीवपूर्वक वापर केला असून यामागे देशाच्या खच्चीकरणाचा ‘टुकडे टुकडे गॅंग''चा अजेंडा आहे असा आरोपही भाजपने केला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT