Amit Shah Resignation Demand Sarkarnama
देश

Amit Shah Resignation Demand : अमित शहांनीही राजीनामा द्यावा; NEET आंदोलन, उमर खालिद पोस्टर अन् काँग्रेसचा मोठा निशाणा

BK Hariprasad demands Amit Shah resignation after Dharmendra Pradhan quits over the NEET paper leak controversy : 'नीट' प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेते बी. के. हरिप्रसाद यांनी केली.

Pradeep Pendhare

Congress on NEET Scam : 'नीट' प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे.

परंतु आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी केली आहे.

बंगळूरमध्ये बोलताना काँग्रेसचे (Congress) हरिप्रसाद यांनी केंद्र सरकारवर टीका केली. त्यांनी 'नीट' आंदोलनादरम्यान उमर खालिदच्या समर्थनार्थ प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरच्या वादावरही प्रतिक्रिया दिली. "यामध्ये चुकीचे काय आहे?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

हरिप्रसाद म्हणाले, "2020 मधील दिल्ली (Delhi) दंगलीप्रकरणातील आरोपी उमर खालिद याला पाच वर्षांपासून तुरुंगात ठेवण्यात आले आहे. अद्याप त्याच्याविरोधात योग्य आरोपपत्र दाखल झालेले नाही. हा पाकिस्तान आहे का? केंद्र सरकार पाकिस्तानच्या पद्धतीने कारभार करत आहे," अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, शुक्रवारी बंगळूरमध्ये झालेल्या 'नीट' आंदोलनादरम्यान काही आंदोलनकर्त्यांनी वादग्रस्त मजकूर असलेले पोस्टर तसेच दिल्ली दंगलीप्रकरणातील आरोपी उमर खालिद आणि शर्जील इमाम यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणारे पोस्टर प्रदर्शित केले होते.

या पोस्टरमुळे आंदोलनस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती चिघळू नये म्हणून स्थानिक पोलिसांनी तत्काळ संबंधित पोस्टर्स जप्त केली. तसेच आंदोलनाच्या आयोजक आणि पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आणि आंदोलन शांततेत सुरू राहिले.

दरम्यान, या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असून, हरिप्रसाद यांच्या वक्तव्यामुळे या वादाला आणखी राजकीय रंग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT