August 15 Independence Day  Sarkarnama
देश

August 15 Independence Day : 2024 साठी आशीर्वाद द्या; पंतप्रधान मोदींचे आवाहन

सरकारनामा ब्यूरो

Pm Narendra Modi : देशासाठी माझी अनेक स्वप्ने आहेत. संकल्प आहे. धोरणे स्पष्ट आहेत. पण आपल्याला काही सत्ये स्वीकारावी लागतील.आज मी लाल किल्ल्यावरून तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. आज आपल्याला काही गोष्टी गांभीर्याने घ्याव्या लागतील. 2047 मध्ये जेव्हा देश स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करेल, त्या वेळी जगात भारताचा तिरंगा ध्वज विकसित भारताचा तिरंगा ध्वज असावा. असा मानस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी व्यक्त केला.

७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, 2014 मध्ये मी बदल घडवून आणण्याचे वचन दिले होते. तुम्ही देशवासीयांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी वचन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. 2019 मधील कामगिरीच्या जोरावर तुम्ही मला पुन्हा आशीर्वाद दिलात. बदलामुळे मला आणखी एक संधी मिळाली. मी तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करीन, असा विश्वास त्यांनी केला. (Independence Day)

2047 चे स्वप्न साकार करण्याचा सर्वात मोठा सुवर्ण क्षण म्हणजे येणारी पाच वर्षे. पुढच्या वेळी 15 ऑगस्टला या लाल किल्ल्यावरून मी तुमच्यासमोर देशाचे यश आणि विकास मांडणार आहे. येत्या 15 ऑगस्टला पुन्हा येईल. मी फक्त तुमच्यासाठी जगतो. कारण तुम्ही माझे कुटुंब आहात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

याचवेळी त्यांनी काँग्रेस आणि विरोधकांवरही अप्रत्यक्ष निशाणा साधला. "भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरण या तीन वाईट गोष्टींविरुद्ध लढणे ही काळाची गरज आहे. मी भ्रष्टाचाराविरुद्ध लढत राहीन. कुटुंबवादाने आपला देश हिरावून घेतला आहे. तिसरे वाईट म्हणजे तुष्टीकरणाचे. त्यामुळे आपल्या देशाला डाग लागला आहे. या तिन्ही वाईट गोष्टींविरुद्ध सर्व शक्तीनिशी लढायचे आहे. या वाईट प्रवृत्तींपासून आपल्याला मुक्ती मिळवायची आहे.

विरोधक आणि काँग्रेसवरही पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून निशाणा साधला. आज परिवारवाद आणि तुष्टीकरणाने आपला देश उद्ध्वस्त केला आहे. राजकीय पक्षाचा कारभार एकच कुटुंबाकडे कसा असू शकतो? देशाच्या विकासासाठी कुटुंबवादापासून मुक्तता आवश्यक आहे. तुष्टीकरणाच्या राजकारणाने सामाजिक न्यायाचा घात केला. देशाला विकास हवा आहे. देशाला 2047 चे स्वप्न साकार करायचे आहे. भ्रष्टाचार आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करू शकत नाही.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT