PM Narendra Modi : मणिपूरमध्ये शांतता पसरत आहे; लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचा दावा

Independence Day PM Speech : स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींना दहावे भाषण
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama

Delhi News : भारताच्या स्वातंत्र्याच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा दहाव्यांदा देशाला मार्गदर्शन केले. ध्वजारोहण केल्यानंतर त्यांनी संपूर्ण देशातील जनतेला आपले कुटुंब म्हणून संबोधित करून मोदींनी भाषणाला सुरुवात केली. भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधानांनी अनेक महिन्यांपासून हिंसाचारग्रस्त मणिपूर राज्याचा उल्लेख केला. मणिपूरमध्ये आता शांतात पसरत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. (Latest Political News)

नरेंद्र मोदी म्हणाले, "मणिपूरमध्ये गेले तीन महिने हिंसाचाराचा काळ होता. या हिंसाचारात अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. आता मात्र येथून सलग शांतता असल्याच्या बातम्या येत आहेत. राज्य आणि केंद्र सरकार समस्या सोडवण्यासाठी एकत्रितपणे काम करत आहेत. यापुढेही राज्याला उभारी देण्यासाठी सर्व प्रयत्न करणार आहे."

Narendra Modi
Maharashtra Politics : राज ठाकरेंना भाजपकडून ऑफर ; शिंदे गटाच्या खासदाराचं सूचक विधान, म्हणाले...

पंतप्रधानांनी मणिपूरच्या लोकांना आश्वासन दिले की संपूर्ण देश त्यांच्यासोबत आहे आणि राहील. "मणिपूरमध्ये पूर्वी महिला आणि मुलींच्या सन्मानाशी खेळले जात होते. आता मात्र संपूर्ण देश मणिपूरसोबत आहे. शांततेतूनच तोडगा काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सराकर कटीबद्ध आहे", असे सांगून पंतप्रधान मोदींनी मणिपूरच्या जनतेला शांततेचे आवाहनही केले आहे.

Narendra Modi
Thane Kalwa Hospital: मुख्यमंत्र्यांनी कळवा रुग्णालयाचा घेतला आढावा; १० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश

ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून पंतप्रधान म्हणाले, "ईशान्येकडील आणि भारताच्या इतर काही भागात, विशेषतः मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. माता आणि मुलींच्या सन्मानाशी खेळले गेले. पण आता गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमधून सतत शांततेच्या बातम्या येत आहेत. संपूर्ण देश मणिपूरच्या जनतेच्या पाठीशी आहे. गेल्या काही दिवसांपासून मणिपूरच्या लोकांनी जी शांतता राखली आहे ती कायम ठेवा. शांततेतूनच समाधानाचा मार्ग निघेल."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com