R C Poudyal sarkarnama
देश

R C Poudyal : दहा दिवसांपासून बेपत्ता, आता कालव्यात आढळला माजी मंत्र्याचा मृतदेह

Akshay Sabale

बिहारमधील विकासशील इन्सान पक्षाचे प्रमुख आणि माजी मंत्री मुकेश सहानी यांचे वडील जीतन सहानी ( 70 ) यांची सोमवारी हत्या झाल्याची थरकाप उडविणारी घटना समोर आली होती. यातच आता सिक्किमचे माजी मंत्री आरसी पौड्याल यांचा मृतदेह पश्चिम बंगालमध्ये आढळून आला आहे.

आरसी पौड्याल यांचा मृतदेह कालव्यात आढळला आहे. पौड्याल यांच्या तपासासाठी 'एसआयटी' स्थापन करण्यात आली होती. घड्याळ आणि कपड्यांमुळे पौड्याल यांची ओळख पटवण्यात आली.

80 वर्षीय पौड्याल यांचा मृतदेह मंगळवारी पश्चिम बंगालमधील ( West Bengal ) सिलिगुडीतील फुलाबारी तीस्ता येथे कालव्यात तरंगताना आढळून आला. तीस्ता नदीमधून पौड्याल यांचा मृतदेह कालव्यात वाहत आल्याचा अंदाज आहे. घड्याळ आणि कपड्यांवरून त्यांची ओळख पटविण्यात आली आहे.

पौड्याल 7 जुलैला सिक्किमधील छोटा सिंगतान येथून बेपत्ता झाले होते. त्यांच्या तपासासाठी सिक्किम सरकारनं 'एसआयटी' स्थापन केली होती. पौड्याल यांच्या मृत्यूप्रकरणी पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पौड्याल सिक्किम विधानसभेचे उपाध्यक्ष राहिले आहेत. तसेच, ते वनमंत्री देखील होते. पौड्याल यांनी 'राइझिंग सन पक्षा'ची स्थापना केली होती. त्यांना सिक्किमच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राचा गाढा अभ्यास होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT