Sunanda Sarkar : नगरसेविकेने आपल्याच पक्षातील नेत्याला रस्त्यावरच दिला चोप; Video सोशल मीडियात व्हायरल

TMC Councilor West Bengal Trinamool Congress : कोलकाता महापालिकेतील नगरसेविका सुनंदा सरकार यांचा मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
Sunanda Sarkar
Sunanda SarkarSarkarnama
Published on
Updated on

Kolkata Municipal Corporation : राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत वादातून अनेकदा हाणामारीच्या घटना घडतात. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्येही असाच प्रकार घडला आहे. एका नगरसेविकेने चक्क आपल्याच पक्षाच्या युवा नेत्याला भर रस्त्यात चोप दिला आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

सुनंदा सरकार असे तृणमूल काँग्रेसच्या नगरसेविकेचे नाव आहे. त्यांनी पक्षाचे त्यांच्या वार्डातील युवा अध्यक्ष केदार दास यांना मारहाण केली आहे. सुनंदा या वॉर्ड क्रमांक 18 मधील टीएमसीच्या तिकीटावर नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. याच वॉर्डात दास पदाधिकारी आहेत.

Sunanda Sarkar
US President Election 2024 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कुणीही झाले तरी उपराष्ट्राध्यक्षांचे असे असेल ‘INDIA’ कनेक्शन

दास यांनी सुनंदा सरकार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यावरून भडकलेल्या नगरसेविकाने भर रस्त्यात दास यांना चोप दिला. एक व्यक्ती त्यांच्यातील वाद सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. या घटनेमुळे टीएमपी बॅकफूटवर गेली आहे.

व्हायरल व्हिडिओनंतर पक्षाकडूनही प्रतिक्रिया आली असून पक्षाचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले, हे खूपच दुर्दैवी आहे. वरिष्ठ नेते आणि लोकप्रतिनिधींनी अधिक सावध राहायला हवे. हे कृत्य योग्य नसल्याची नाराजी घोष यांनी व्यक्त केली.

Sunanda Sarkar
US President Election 2024 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कुणीही झाले तरी उपराष्ट्राध्यक्षांचे असे असेल ‘INDIA’ कनेक्शन

भाजपकडूनही एक्सवर व्हिडिओ पोस्ट करत टीएमसीवर निशाणा साधण्यात आला आहे. सुनंदा सरकार यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप असून पक्षातील वाद चव्हाट्यावर आल्याचे म्हटले आहे. या घटनेवरून पुन्हा एकदा भाजपला आयते कोलित मिळाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com