नवी दिल्ली : रशियाने (Russia) युक्रेनमधील खारकीव्हमध्ये (Kharkiv) केलेल्या हल्ल्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. या विद्यार्थ्याचे नाव नवीन शेखरप्पा ग्यानगौडर (Naveen Shekharappa Gyanagoudar) असे होते. अखेर तब्बल 21 दिवसांनी नवीनचे पार्थिव भारतात आणण्यात मोदी सरकारला यश आले आहे. त्याच्या आई-वडिलांना शेवटी नवीनचा चेहरा पाहता आला आहे.
नवीनचे पार्थिव आज पहाटे 3 वाजता बंगळूर विमानतळावर पोचले. तेथे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पार्थिवाचे दर्शन घेतले. नंतर तेथून ते रुग्णवाहिकेतून हावेरीतील त्याच्या गावी सकाळी 9 वाजता पोचले. यावेळी अनेक राजकीय नेत्यांसह सरकारी अधिकारी नवीनच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी हजर होते. नवीनचे वडील शेखरप्पा आणि त्याच्या आईला अश्रू आवरता आले नाहीत. नवीन हा बावीस वर्षांचा होता. युक्रेनमधील (Ukraine) खारकीव्ह या शहरात तो वैद्यकीय पदवीचे चौथ्या वर्षाचे शिक्षण घेत होता.
रशियाच्या बॉम्बहल्ल्याचा नवीन बळी ठरला होता. नवीन हा एका सुपर मार्केटमध्ये काही वस्तू खरेदी करण्यासाठी गेला होता. यावेळी सुपर मार्केटबाहेर रांग लागली होती. नवीन रांगेत उभा असतानाच जवळच झालेल्या बॉम्बहल्ल्यात नवीनचा मृत्यू झाला होता. किव्हमधून (Kyiv) तातडीने बाहेर पडण्याचे आवाहन भारतीय दूतावासाकडून (Indian Embassy) अडकलेल्या भारतीय नागरिकांना करण्यात आले होते. पण त्याआधीच खारकीव्हमध्ये नवीनचा मृत्यू झाला होता. (Russia-Ukraine War)
रशिया-युक्रेन युध्दामध्ये नवीन हा पहिला भारतीय बळी ठरला होता. त्यामुळे भारतासाठी ही मोठी नामुष्की ठरली होती. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनीही याला दुजोरा दिला होता. अरिंदम बागची (Arindam Bagchi) यांनी ट्विटरवर म्हटले होते की, खारकीव्ह येथे आज सकाळी बॉम्बहल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही अतिशय दु:खदायी घटना आहे. या मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात परराष्ट्र मंत्रालय आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भात रशिया आणि युक्रेनच्या राजदूतांशी संपर्क साधला. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना तेथून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सुरक्षित पर्याय उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली आहे. याचप्रकारची मागणी भारताच्या रशिया आणि युक्रेनमधील राजदूतांनीही केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.