मलिकांना न्यायालयाचा दिलासा; आणखी तीन मागण्या न्यायालयाकडून मान्य

राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या मागण्या न्यायालयाने मान्य केल्या आहेत.
Nawab Malik News Updates, High Court on Nawab Malik News
Nawab Malik News Updates, High Court on Nawab Malik NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व अल्पसंख्यांक विकासमंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांना सक्त वसुली संचालनालयाने (ED) अटक केली आहे. यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. मलिक हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत न्यायालयाने 4 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. याचवेळी मलिकांच्या आणखी तीन मागण्या मान्य करीत न्यायालयाने त्यांना दिलासाही दिला आहे. (Nawab Malik News Updates)

गँगस्टर दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरला मालमत्तेसाठी मलिक यांनी पैसे दिले. पारकरने ते दाऊद इब्राहिमला दिले, असा दावा करत हे 'टेरर फंडिंग` असल्याचा आरोपी ईडीने केला आहे. ईडीने अटक केल्यानंतर कार्यालयातून बाहेर पडताना मलिक यांनी `नही झुकेंगे और भी लढेंगे, सबको एक्सपोज कर देंगे` अशी प्रतिक्रिया दिली होती. मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजपने त्यांच्या राजीनाम्यांची मागणी केली आहे. तर महाविकास आघाडी सरकारने मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे. मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 4 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. याचबरोबर त्यांना न्यायालयीन कोठडीत बेड, गादी आणि खुर्ची देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. याबाबत मलिक यांच्या वतीने न्यायालयाकडे मागणी करण्यात आली होती.

Nawab Malik News Updates, High Court on Nawab Malik News
नाराज क्षीरसागरांची मेळाव्याला दांडी अन् 24 तासांतच मातोश्रीवर हजेरी

याआधी नवाब मलिक यांच्या तीन मागण्या न्यायालयाने मान्य केल्या होत्या. ईडीच्या कोठडीत असताना घरचे जेवण मिळावे, चौकशीदरम्यान आपल्या वकिलांना उपस्थित राहण्याची परवानगी मिळावी आणि रोजची औषधे घेऊ द्यावीत, अशा तीन मागण्या करण्यात आल्या होत्या. या तिन्ही मागण्यांना न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला होता. आता त्यांच्या आणखी तीन मागण्या न्यायालयाने मान्य केल्या आहेत.

Nawab Malik News Updates, High Court on Nawab Malik News
कोल्हापूर उत्तरचा महाविकास आघाडी फॉर्म्युला बंटी पाटलांनीच केला उघड!

दरम्यान, ईडीने अटक केल्याच्या विरोधात मलिक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ईडीची कारवाई चुकीची असल्याचा दावा त्यांनी केला होता. हे प्रकरण 22 वर्षांपूर्वीचे असल्याचेही त्यांनी म्हटले होते. न्यायालयाने मलिक यांची ही याचिका फेटाळून लावली होती. यामुळे मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मलिक हे न्यायालयीन कोठडीत असून, त्यांना आता सुटकेसाठी रीतसर जामिनासाठी अर्ज करावा लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Gangster Murder Mystery
Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com