PM Modi  Sarkarnama
देश

Loksabha Election 2024 : ...अन् मशिदीतही घुमला 'मोदी है तो मुमकिन है'चा नारा!

PM Modi News : जाणून घ्या, नेमकं काय घडलं आणि कुठं घडली घटना!

सरकारनामा ब्यूरो

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून मतदारसंघांमध्ये जोरदार प्रचार सुरू आहे. शिवाय, विरोधी पक्षांवर आणि नेत्यांवरही आरोप सुरू आहेत. मतदारांकडूनही राजकीय पक्षांना संमिश्र प्रतिसाद मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशची राजधानी असणाऱ्या भोपाळमध्ये एक लक्षवेधी घटना घडली आहे.

भोपाळमधील एका मशिदीत 'मोदी है तो मुमकिन है'चे नारे लागले. याप्रसंगी भाजपचे(BJP) उमेदवार अलोक शर्मा उपस्थित होते. विशेष म्हणजे या ठिकाणी बोहरा समुदायाकडून मशिदीत पंतप्रधान मोदींचे पोस्टरही लावले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भोपाळमधील अलीगंज हैदरी मशिदीतील ही घटना आहे. जिथे पंतप्रधान मोदींच्या समर्थनात नारेबाजी झाली. या ठिकाणी बोहरा समुदायाच्या लोकांनी हर हर मोदी, घर घर मोदी हे नारे दिले. याचबरोबर त्यांनी मोदी है तो मुमकिन है, अबकी बार चारसौ पार हे नारे सुद्धा दिले.

मशिदीचे आमिल जौहर अली यांनी पंतप्रधान मोदी यांची स्तुती केली. त्यांनी म्हटले की, आम्ही त्यांच्या यशासाठी प्रार्थना करतो. त्याच्याशी आमचे कुटुंबासारखे नाते आहे. भोपाळ लोकसभा मतदारसंघात भाजचे माजी महापौर अलोक शर्मा आणि काँग्रेसचे अरुण श्रीवास्तव यांच्यात लढत होणार आहे.

''विकासामध्ये बोहरा समाजाचा मोठा वाटा आहे. बोहरा समाजाबरोबर चार पिढ्यापासून मी जोडलो गेलेलो आहे. मी परदेशात गेलो तरी बोहरा समाजातील माझे बांधव भेटायला येतात. त्यामुळे मी तुमच्या कुंटुबांतील एक सदस्य आहे असे वाटते. माझ्या चार पिढ्या बोहरा मुस्लिम समाजासोबत गेल्या आहेत. या समाजाने स्वत:ला सिद्ध केले आहे'', असं मोदी म्हणालेले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT