Narendra Modi News : बोहरा समाजाशी माझं जुनं नातं; नरेंद्र मोदींचे गौरवोद्गार

Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर होते
Narendra Modi
Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

''विकासामध्ये बोहरा समाजाचा मोठा वाटा आहे. बोहरा समाजाबरोबर चार पिढ्यापासून मी जोडलो गेलेलो आहे. मी परदेशात गेलो तरी बोहरा समाजातील माझे बांधव भेटायला येतात. त्यामुळे मी तुमच्या कुंटुबांतील एक सदस्य आहे असे वाटते. माझ्या चार पिढ्या बोहरा मुस्लिम समाजासोबत गेल्या आहेत. या समाजाने स्वत:ला सिद्ध केले आहे'', असं मोदी यावेळी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे आज मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी मोदी यांनी बोहरा मुस्लिम समुदायाचे अलजेमा-तूस-सैफी संकुलाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी उपस्थित समुदायाला संबोधित केले.

Narendra Modi
Shiv Jayanti : आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंती होणारच; राज्य सरकार सहआयोजक

मोदी म्हणाले, ''भारत आज विकासाच्यामार्गाने कार्य करत आहे. व्यावसायासाठी विवाद से विश्वास ही योजना आणली. बोहरा समाजाची विकासामध्ये महत्वाची भूमिका राहिली आहे. विकासाबरोबर आपली परंपरा देखील महत्वाची आहे. बोहरा समाजाचे भारतावर प्रेम आहे. पाणी वाचवण्यासाठी बोहरा समाजाने मोठं योगदान दिलं आहे'', असं ते यावेळी म्हणाले.

Narendra Modi
Chhagan Bhujbal News; सत्तर वर्षाचे सोडा, आठ वर्षात काय केले ते सांगा!

''गेल्या ८ वर्षात अनेक जुने कायदे रद्द केले. अनेक महत्वाचे निर्णय घेतले. तर विकासाच्या बदलाच्या पार्श्वभूमीवर बोहरा समाजाने नेहमीच स्वतःला सिद्ध करण्याचे काम केले आहे. माझे भाग्य आहे की मी या कुटुंबाशी जोडलेला आहे. आज या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांचा विस्तार हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. बोहरा समाजाकडून मला प्रेम मिळालं. परदेशात गेलो तरी बोहरा बांधव भेटतात'', असं मोदी यावेळी म्हणाले.

दरम्यान, २२ दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा मुंबई दोऱ्यावर आले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com