Allu Arjun revanth reddy  sarkarnama
देश

Allu Arjun house Attack : अभिनेता अल्लू अर्जुनच्या घरावरील हल्ल्यामागे 'काँग्रेस कनेक्शन'? विरोधकांचा गंभीर आरोप

bras BJP Alleges Congress Allu Arjun revanth reddy : अल्लू अर्जुन याच्या घरावर हल्ला करणाऱ्या आरोपींपैकी एका जणाचा मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्यासोबत असलेल्या फोटो व्हायरल झाला आहे.बीआरएस नेता कृषांक यांनी या विषयी आरोप केला आहे.

Roshan More

Congress News:अभिनेता अल्लू अर्जुन यांच्या घराबाहेर 22 डिसेंबरला तोडफोड करण्यात आली. तोडफोड करणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या सहा जणांनाही बिनशर्त जामीन देखील मंजूर झाला आहे. मात्र, अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला करण्यामागे काँग्रेस कनेक्शन असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

तेलंगणामधील बीआरएसने काँग्रेस सरकार आणि मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्यावर निशाणा साधला आहे. बीआरएसचे आमदार टी हरीश राव म्हणाले की, अल्लू अर्जुन यांच्या घरावर हल्ला म्हणजे काँग्रेसच्या नाकर्तेपणाचा पुरावा आहे. 2024 या एकाच वर्षात हैद्राबादमध्ये 35 हजार 944 गुन्हे घडले आहेत.

भाजपचे खासदार डी के अरुणा यांना दावा केला की अभिनेता अल्लू अर्जुन याच्या घराची तोडफोड करणारे चार जण हे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्या विधानसभा क्षेत्र कोडंगल येथील आहेत. त्यामुळे संशय व्यक्त होतो आहे की या तोडफोडीच्या घटनेमागे काँग्रेसचा कट आहे.

आरोपींचा मुख्यमंत्र्यांसोबत फोटो

अल्लू अर्जुन याच्या घरावर हल्ला करणाऱ्या आरोपींपैकी एका जणाचा मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्यासोबत असलेल्या फोटो व्हायरल झाला आहे.बीआरएस नेता कृषांक यांनी आरोप केला आहे की, अल्लू अर्जुन याच्या घरावर हल्ला करणाऱ्यांपैकी विद्यार्थी नेता रेड्डी श्रीनिवास हा 2019 च्या जिला परिषदच्या निवडणुकीतमध्ये रेवंत रेड्डी और काँग्रेस उमेदवाराचा जवळचा सहकारी होता.

आरोपींना बिनशर्त जामीन

घरावर हल्ला करत थोडफोड करणाऱ्या सहा आरोपींना न्यायालयाने बिनशर्त जामीन मंजुर केला. न्यायालयात सांगण्यात आले की आरोपी हे शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते मात्र पोलिसांनी बळाचा वापर केल्याने त्यांनी स्वसंरक्षणासाठी पाऊल उचलले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT