Jantar Mantar News  Sarkarnama
देश

Brij Bhushan Sharan Singh Case: पैलवान अन् पोलिसांमध्ये मध्यरात्री 'दंगल'; विनेश फोगाट,साक्षी मलिक यांना रडू कोसळलं

Jantar Mantar News: आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने वाद आणखी वाढला.

सरकारनामा ब्यूरो

Brij Bhushan Sharan Singh Case: दिल्लीच्या जंतर-मंतरवर सुरु असलेल्या कुस्तीपटुंच्या आंदोलनाला वेगळं वळण लागलं आहे. काल (बुधवारी) मध्यरात्री पोलीस आणि पैलवान यांच्यात जोरदार शाब्दीक चकमक झाली. आंदोलन करणाऱ्या पैलावानांना पोलिसांनी धक्काबुक्की केली. यात दोन मल्ल जखमी झाले आहेत.

महिला पैलवानांना पोलिसांनी शिवीगाळ करुन धक्काबुक्की केल्याचा आरोप पैलवान बजरंग पुनिया यांनी केला आहे. पाऊस असल्यामुळे आंदोलन करणाऱ्या पैलवानांनी फोल्डिंगचे बेड मागवले होते. हे बेड घेऊन येत असलेल्या आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने वाद आणखी वाढला.

पोलिसांनी सोमनाथ भारती यांना अडवले. पा‌वसात गाद्या भिजल्याने बेड ठेवण्याची परवानगी पैलवानांनी मागितली होती.पोलिसांनी त्यांची मागणी फेटाळताच गोंधळास सुरुवात झाली. काही वेळाने सोमनाथ भारती यांना सोडून देण्यात आले.

आम्ही अपराधी आहोत का?

या सर्व गंभीर प्रकार होत असताना पैलवान विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांना रडू कोसळले. "आम्ही देशाचे नाव उज्ज्वल करणारे खेळाडू आहोत, पण आम्हाला अपराधी असल्यासारखी वागणूक देण्यात येत आहे," असे साक्षी मलिक म्हणाली.

पोलिसांनी डोके फोडले..

"माझा धाकटा भाऊ दुष्यंत याचे डोके पोलिसांनी फोडले," असा आरोप गीता फोगटने केला आहे. दारु पिऊन पोलिसांनी पैलवानांवर हल्ला केल्याचा आरोप दिल्ली सरकाचे मंत्री सौरभ भारव्दाज यांनी केला आहे. याप्रकरणची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

बृजभूषण शरण सिंह यांना तुरुंगात पाठवा

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी महिला पैलवानांचा लैगिंक छळ केल्याचा आरोप आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बृजभूषण शरण सिंह यांना तुरुंगात पाठवल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात येईल, असेही पुनियाने ठणकावून सांगितले.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT