Rashtrawadi New President : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याची घोषणा शरद पवार यांनी केल्यानंतर राष्ट्रवादीच्या बैठकांचे सत्र सुरु आहे. सुमारे दोन तासापासून राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक मुंबईत सुरु आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निमंत्रण नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
बैठकीला जयंत पाटलांना डावलण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत जयंत पाटील यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला. ते पुण्यात बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले, "मी पक्षावर नाराज नाही, अन् पक्षही माझ्यावर नाराज नाही. बैठकीला मला बोलवण्याची पक्षाला गरज वाटली नसावी," जयंत पाटलांच्या या विधानामुळे ते नाराज असल्याचे दिसते. पक्षाच्या नव्या नेतृत्वाबाबत बोलण्यास त्यांनी टाळलं.
राष्ट्रवादीने स्थापन केलेल्या समितीची आज बैठक नव्हती, असे राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांना सांगितले. "राष्ट्रवादीच्या कामाची विभागणी आधीच झाली आहे. राज्यात अजित पवार तर केंद्रात देशपातळीवर सुप्रिया सुळे यांचे (लोकसभेत) काम आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे या अध्यक्ष व्हायला अडचण नाही," असे भुजबळ म्हणाले.
"आपल्या निर्णयावर शरद पवार ठाम आहेत. सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष करा, याला त्यांनी नकार दिला आहे. पवारांनी आपला निर्णय बदलला नाही तर निर्णय घ्यावा लागेल," असे भुजबळ म्हणाले.
पक्षाचे नेते आणि मुंब्रा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा पदाधिकाऱ्यांसह राजीनामा दिला आहे. यानंतर त्यांना प्रसार माध्यमांशी संवाद साधत शरद पवार यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केले.
मी एकटा आहे. मी लोक मोजून राजकारण करत नाही. 35 वर्षांपासून राजकारणात आहे, पण हे कधीच नाही मोजले की माझ्यामागे किती लोक आहेत. त्यामुळे आजपर्यंत मी जी कोणती भूमिका घेतली आहे ती लोकांनी मान्य केली आणि नंतर पक्षाने देखील ती भूमिका मान्य केल्याचे यावेळी जितेंद्र आव्हाडांकडून सांगण्यात आले. अनिल पाटील यांनीही आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
आज शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक..
आज चार वाजता राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सिल्वर ओकला होणार असल्याचे समजते जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.