New Delhi News: भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी काही दिवसांपूर्वीच अयोध्येतील राम मंदिर निधी व दानपेटीतील कथित गैरव्यवहार आणि चोरीच्या मुद्द्यावरुन धक्कादायक विधान केलं होतं. यामुळे भाजपसह राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. आता याच ब्रिजभूषण शरण सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सहा महिला कुस्तीपटूंनी थेट भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष आणि तत्कालीन भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावरच लैंगिक शोषणाच्या आरोप केल्यानं देशभरासह क्रीडा विश्वात मोठी खळबळ उडाली होती. महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप करत सिंह यांच्याविरोधात दिल्लीसह विविध ठिकाणी आंदोलनं केली होती. त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं.
आता दिल्लीतील राऊज अव्हेन्यू न्यायालयानं सोमवारी (ता.3 ऑगस्ट) लैंगिक शोषण प्रकरणात ब्रिजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता केली आहे. महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक शोषण प्रकरणाचा निकालावेळी भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह स्वतः न्यायालयात उपस्थित होते.
न्यायालयानं या प्रकरणी सिंह यांच्यासह भारतीय कुस्ती महासंघाचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांच्यावरही एका महिला तक्रारदाराला धमकावल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्याविरोधातही गुन्हेगारी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.आता न्यायालयानं विनोद तोमर यांचीही निर्दोष मुक्तता केली आहे. दिल्ली कोर्टाचा हा निकाल सहा कुस्तीपटूंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे देशातील दिग्गज कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले होते. साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत मोठे आंदोलन झाले. वाढत्या दबावामुळे त्यांना भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदापासून दूर व्हावे लागले होते.
सहा महिला कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी 15 जून 2023 रोजी पोलिसांनी न्यायालयात चार्जशीट दाखल केली होती.
तसेच भाजप नेते ब्रिजभूषण सिंह यांच्यावर विविध कलमांखाली आरोप निश्चित आले होते. त्यानंतर 10 मे 2024 रोजी ट्रायल कोर्टाने पाच महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक शोषण आणि विनयभंगाच्या आरोपांप्रकरणी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात औपचारिक आरोप निश्चित केले होते.
ब्रिजभूषण शरण सिंह हे भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय जनता पक्ष आणि समाजवादी पक्षाचे सदस्य होते. ते कैसरगंज, गोंडा व बलरामपूर मतदारसंघातून सहावेळा खासदार होते. ते भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष होते. त्यांचा मुलगा करण भूषण सिंह कैसरगंजमधून भाजपच्या तिकीटावर लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीत निवडून आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.