Brijbhushan Singh Political news :  Sarkarnama
देश

Brijbhushan Singh : राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच ब्रिजभूषण सिंहांनी माईक तोडला; नेमकं झालं काय?

Political news : महिलेने ब्रिजभूषण यांना लैंगिक छळ प्रकरणाबाबत अनेक प्रश्न विचारले होते.

सरकारनामा ब्यूरो

Brijbhushan Singh Political news : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी प्रमुख आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंसोबत झालेल्या लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अशातच ब्रिजभूषण शरण सिंह यांनी महिला पत्रकाराशी गैरवर्तन केल्याचे प्रकरण समोर आले आहे. लैंगिक छळाच्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातमीवर महिला पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली होती. त्यावर ब्रिजभूषण सिंह यांनी महिला पत्रकाराशी गैरवर्तन करत त्यांनी महिला पत्रकाराचा माईक आणि कॅमेराही तोडला.

मंगळवारी (११ जुलै) एका वृत्त वाहिनीच्या महिला पत्रकाराने ब्रिजभूषण यांना लैंगिक छळ प्रकरणाबाबत अनेक प्रश्न विचारले. पण पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देण्यास नकार देत ब्रिजभूषण यांनी जोरात कारचा दरवाजा बंद केला. त्यामुळे महिला पत्रकाराच्या माईकचे नुकसान झाले. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिजभूषण शरण सिंह दिल्ली विमानतळावरून येत होते. महिला पत्रकाराने त्यांना महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांवर तिखट प्रश्न विचारला. लैंगिक छळाचे आरोप खरे आहेत का? भूषणविरुद्ध दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात लैंगिक छळाची चर्चा असल्याचं वृत्तपत्रात प्रसिद्ध झालं आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी विचारत आहेत की, पक्ष तुम्हाला का काढत नाही? या प्रश्नावर कोणतेही उत्तर न देता ब्रिजभूषण सिंह पुढे निघून गेले.

वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीचा हवाला देत आरोपपत्राबाबत महिला पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला असता ब्रिजभूषण सिंग यांनी मला तुमच्याशी काही बोलायचे नाही, असे स्पष्टपणे सांगितले. यानंतर महिला पत्रकाराने ब्रिजभूषण यांना त्यांच्या राजीनाम्याबाबत प्रश्न केल्यावर मात्र ते चांगलेच भडकले.

ब्रिजभूषण सिंह त्यांच्या गाडीकडे जाऊ लागले, महिला पत्रकाराने पुन्हा तोच प्रश्न विचारला असता, त्यांनी कोणतेही उत्तर न देता आपल्या गाडीचा दरवाजा जोरात बंद केला. दरवाजा बंद करत असतानाच माइकला दरवाजा आदळला आणि माईक तुटला. दरम्यान, दिवसेंदिवसं ब्रिजभूषण सिंह यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषण प्रकरणी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने ब्रिजभूषण शरण सिंह आणि त्यांचे सचिव विनोद तोमर यांना 18 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT