K. Chandrashekhar Rao Sarkarnama
देश

KCR Skips Opposition Meet: एकजुटीपूर्वीच विरोधी पक्षात फाटाफूट; केसीआर यांनी घेतला मोठा निर्णय..

BRS Chief KCR News: तेलगंणामध्ये काँग्रेसचा बीआरएस पराभव करेल, असा विश्वास केसीआर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

सरकारनामा ब्युरो

Opposition Unity: आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांच्या एकजुटीचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे.पाटणा येथे होणाऱ्या बैठकीत फक्त त्या पक्षांना बोलावण्यात आले आहे, जे आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढवतील. विरोधी पक्षांच्या एकजुटीला निवडणूकपूर्व आघाडी म्हटले जात आहे.

बिहारची राजधानी पाटना येथे २३ जून रोजी देशभरातील विरोधी पक्षांची बैठक आहे. या बैठकीला तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे विरोधीपक्षाच्या एकजुटीवर त्याचा परिणाम होणार आहे.

के चंद्रशेखर राव यांनी सांगितले की काँग्रेस आणि भाजपपासून आम्ही दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या राज्यात काँग्रेसची स्थानिक पक्षाची थेट लढत आहे, असे स्थानिक पक्ष काँग्रेसला दूर ठेवणार आहेत, असे ते म्हणाले.

'विरोधीपक्षाच्या गटात काँग्रेस असेल आम्ही सहभागी होणार नाही,' असे के चंद्रशेखर राव यांनी विरोधी पक्षाच्या गटाचे नेतृत्व करणारे बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना सांगितले आहे. काँग्रेस आमचा प्रमुख विरोधी पक्ष आहे, असे केसीआर यांनी स्पष्ट केलं आहे.

तेलंगणा येथे काँग्रेस भाजच्या पुढे असल्याचे एका पाहणीत समोर आले आहे, आम्हाला विरोधी पक्षाकडे असे दुर्लक्ष करुन चालणार नाही, कर्नाटकमध्ये काँग्रेस जरी सत्ता स्थापन केली असली तरी, तेलगंणामध्ये काँग्रेसचा बीआरएस पराभव करेल, असा विश्वास केसीआर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

येत्या डिसेंबर महिन्यात तेलंगणा, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, राजस्थान, मिझोरम येथे विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. अनेक महिन्यानंतर केसीआर यांनी स्पष्टपणे कॉँग्रेसला विरोध केला आहे.

या वर्षाच्या डिसेंबर महिन्यात तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा तसेच भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षांकडून कसून तयारी केली जात आहे. बीआरएस पक्षाचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव हे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

दरम्यान, बीआरएसने नांदेड मार्गे महाराष्ट्रातील राजकारणात उडी घेतली आहे. 'अबकी बार किसान सरकार' असा नारा देत त्यांनी तेलंगणात आम्ही जे शेतकऱ्यांसाठी करून दाखवलं, ते तुम्ही करा, आम्ही महाराष्ट्रात येणार नाही, असे खुले आव्हान राज्यातील राज्यकर्त्यांना दिले आहे. यावर तेलंगणा माॅडेल छोटे राज्य असल्याने तिथे यशस्वी ठरले, महाराष्ट्रात ते शक्य नाही, असा सूर सत्ताधारी आणि विरोधकांनी देखील काढला आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT