Jalgaon Lok Sabha Constituency: खानदेशातील या दोन लोकसभाबाबत शरद पवार कोणता मंत्र देणार ?

Sharad Pawar On Jalgaon and Raver Lok Sabha Constituencies: अमळनेर येथे उद्या (ता.१६) रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस ग्रंथालय सेलचे अधिवेशन होत आहे
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघ एका पोटनिवडणूकीतील जळगाव लोकसभेतील राष्ट्रवादीचा विजय वगळता गेली पाच टर्म भारतीय जनता पक्षाकडेच आहे, यावेळी या जागावर राष्ट्रवादीचा पर्यायाने महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार शुक्रवारी (ता.१६) रोजी कोणता मंत्र देणार याकडेच जिल्ह्याचे लक्ष आहे.

अमळनेर येथे राष्ट्रवादीच्या ग्रंथालय सेलच्या अधिवेशनासाठी शरद पवार , अजित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड येत आहेत. खासदार शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची टीम जळगाव जिल्ह्यात येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Sharad Pawar
Sanjay Raut Threat Case : मोठी बातमी ; राऊत धमकी प्रकरण बनाव ? आरोपी मयूर शिंदे हा सुनील राऊतांचा निकटवर्तीय..

शरद पवार आज रात्री आठ वाजता राजधानी एक्सप्रेसने मुंबईहून जळगावला येत आहेत. तर अजित पवार व जयंत पाटील हे शिरपूर (जि.धुळे )येथे एका कार्यक्रमात सहभागी होवून अमळनेर येथे येणार आहेत.

अमळनेर येथे उद्या (ता.१६) रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस ग्रंथालय सेलचे अधिवेशन होत आहे.पक्षाचे ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी या अधिवेशनाचे आयोजन केले आहे. खासदार शरद पवार यांच्या हस्ते उद्धघाटन होणार आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे.प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,आमदार जितेंद्र आव्हाड याचेही भाषण होणार आहे.

Sharad Pawar
BJP Vs Shiv Sena: शिवसेनेच्या जाहिरातीला भाजपचे प्रत्युत्तर; वाजपेयींच्या कवितेचा आधार घेत..

यावेळी खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्यांची तसेच कार्यकर्त्यांची बैठक अमळनेर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यालयात होणार आहे. यावेळी शरद पवार हे जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा निवडणूकीचा आढावा घेणार असल्याचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पाटील व आमदार अनिल भाईदास पाटील यांनी सांगितले.

दोन्ही लोकसभा निवडणूका पक्षातर्फे तसेच महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याबाबत चर्चा होईल. जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघ सद्यस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहेत.

गेली पाच टर्म हा मतदार दोन्ही मतदार संघ भाजपच्याच ताब्यात आहेत. त्या अगोदर हे मतदार संघ कॉंग्रेसकडे होते, तर एका पोटनिवडणुकीत जळगाव लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीला यश मिळाले होते. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत दोन्ही लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादी कॉंग्रेसने लढले होते, मात्र त्यांना यश आले नाही. यावेळीही दोन्ही लोकसभा मतदार संघ पक्षाने लढविण्याचे ठरविले आहे.

भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना पक्षाने विधानपरिषदेवर प्रतिनिधीत्व दिल आहे.त्यांच्याकडे निवडणूकाची खानदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशानंतर या पहिल्याच निवडणुका होत असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाचीही कसोटी लागणार आहे.

महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लोकसभा लढवायच्या असल्याचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी सांगितले. त्या दृष्टीने पक्षाचे नेते शरद पवार हे आढावा घेणार असून ते मार्गदर्शनही करणार आहेत. त्यामुळे ते या दोन्ही लोकसभेसाठी कोणता मंत्र देणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com