Congress Vs BRS Politics : तेलंगण राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपला भारत राष्ट्र समिती (बीआरएस) हा पक्ष देश पातळीवर नेण्याचे ठरवले आहे. यासाठी त्यांनी महाराष्ट्रातून सुरुवात केली आहे. राव यांनी महाराष्ट्रात नांदेड, छत्रपती संभाजीनगरसह इतर ठिकाणी सभा घेतल्या. येथून त्यांनी 'अब की बार किसान सरकार' असा नारा दिला. राज्यात जम बसवण्यासाठी राव यांनी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू केले आहे. (Latest Political News)
राज्यतील अनेक बड्या नेत्यांनी 'बीआसएस'मध्ये प्रवेश केला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील नेत्यांची संख्या जास्त आहे. दरम्यान, पुणे येथे 'बीआरएस'चे मोठे कार्यालय होणार असल्याचेही राज्यातील नेत्यांनी माहिती दिली. यामुळे राज्यात 'बीआरएस'चा मोठा बोलबाला सुरू आहे. अशा वातावरणातच तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना मोठा धक्का बसला आहे. हा धक्का त्यांना त्यांच्याच राज्यात बसला आहे.
देशपातळीवर ओळख निर्माण करू पाहणाऱ्याला 'बीआरएस' पक्षाला तेलंगणातच खिंडार पडले आहे. पक्षातील माजी मंत्रीपद भूषवलेले काही नेत्यांसह खासदार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. दिल्ली येथे आज सोमवारी (ता. २६) मल्लीकार्जुन खर्गे यांच्या उपस्थित हा पक्ष प्रवेश होणार आहे. तेलंगणातील 'बीआरएस'चे नेते माजी मंत्री कृष्णा राव, माजी खासदार पी. एस. रेड्डी आदी बड्या नेत्यांसह सुमारे २० नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्षांना 'बीआरएस'ने खिंडार पाडले आहे. यात माजी आमदार हर्षवर्धन जाधव, भगिरथ भालके, शेतकरी चळवळीचे नेते शंकरअण्णा धोंडगे, यशपाल भिंग, शिवराज बांगर आदी नेत्यांचा समावेश आहे. 'बीआरएस'ने राज्यातील तेलंगणाला लागून असलेल्या गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. 'बीआरएस' ही भाजपची 'बी' टीम असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून केला जात आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.