Harshvardhan Jadhav News : 'बीआरएस' अन् हर्षवर्धन जाधवांच्या दाव्यांची पुणतांब्याच्या शेतकऱ्याने केली पोलखोल

Onion Politics : राज्यातील शेतकऱ्यांनी आपला कांदा राज्यातच विकवा
Harshvardhan Jadhav
Harshvardhan JadhavSarkarnama
Published on
Updated on

Farmers On Harshvardhan Jadhav : तेलंगाणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाचा महाराष्ट्रात झंझावात सुरू झाला आहे. नांदेड, छत्रपती संभाजीनगर येथील बीआरएसच्या सभा गाजल्या. येथून राव यांनी 'अबकी बार किसान सरकार' अशी घोषणा दिली. यानंतर राज्यभर या आशयाचे फलक लागलेले दिसून येत आहेत. त्यातच बीआरएसमध्ये राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी प्रवेश केला आहे. हे नेते तेलंगणात शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती राज्यात देत आहेत. (Latest Political Marathi News)

Harshvardhan Jadhav
Sanjay Raut News : '' राऊतांनी किमान साताऱ्यात येताना तोंडाला लगाम लावावा; नाहीतर...'' ; शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाचा गर्भित इशारा

दरम्यान, कन्नडचे माजी आमदार बीआसएसचे राज्यातील नेते हर्षवर्धन जाधव यांचा कांद्याबाबत एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात त्यांनी राज्यात कांद्याला दर मिळत नाही. तेलंगाणामध्ये मात्र कांद्याला चांगला भाव मिळत आहे. तेथे दोन हजार रुपयांपर्यंत प्रति क्लिंटल दर मिळत असल्याचा दावा जाधव यांनी केला. तसेच रज्यातील शेतकऱ्यांनी तेलंगणातील बाजारपेठेत कांदा नेऊन विकवा, असे आवाहनही त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केले होते.

Harshvardhan Jadhav
Imtiyaz Jaleel on Navneet Rana : इम्तियाज जलीलांचे नवनीत राणानं खुलं आव्हान ; ओवेसींनी परवानगी दिली तर..

माजी आमदार जाधव यांच्या आवाहनाननंतर शिर्डीजवळील पुणतांबा गावातील योगेश वाणी या शेतकऱ्याने हैदराबाद मार्केटमध्ये नेला. तेथे गेल्यानंतर वाणी यांना सर्व वास्तव समजले. त्यांच्या कांद्याला कवडीमोल दर मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपला कांदा राज्यातील मार्केटमध्येच विकण्याचे आवाहन केले आहे. याबाबत त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना २४ जून रोजीची आहे.

योगेश वाणी म्हणाले, "बीआरएसचे नेते हर्षवर्धन जाधव यांचा व्हिडिओ पाहिला. त्यात त्यांनी तेलंगणा राज्यात दोन हजार रुपयांपर्यंत कांद्याला दर मिळत असल्याचे सांगितले. त्यानुसार मी ५०० गोणी कांदा हैद्राबाद मार्केटमध्ये विक्रीसाठी नेला होता. त्यासाठी सुमारे तीन रुपये प्रति किलो वाहतूक खर्च झाला. येथे आल्यानंतर ८०० ते एक हजार असा प्रतिक्विंटल दर मिळाला. येथे ६ टक्के शेतकऱ्याकडून आडत घेतली जाते. सर्व खर्च जाऊन मला सुमारे साडेसहाशे रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. महाराष्ट्रातून येथे आलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com