Mayawati, Narendra Modi, kanshi Ram  Sarkarnama
देश

Mayawati News : कांशीराम यांचे नाव घेत मायावतींची मोदींकडे मोठी मागणी...

Rajanand More

New Delhi : माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह आणि पी. व्ही. नरसिंह राव यांच्यासह प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ एम. एस. स्वामिनाथन यांना आज भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला होता. त्यानंतर आता बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावतींनी मोदी सरकारकडे मोठी मागणी केली आहे. (Mayawati News)

भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज तिघांना भारतरत्न जाहीर झाल्याची माहिती ट्विटरवरून दिली. एकाच वर्षी पहिल्यांदाच पाच जणांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. मागील वर्षी एकाही व्यक्तीला पुरस्कार न दिल्याने यावर्षी पाच जणांची निवड करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, हे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मायावतींनीही कांशीराम (Kanshi Ram) यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी मोदी सरकारकडे (Modi Government) केली आहे. ‘भाजप सरकारने भारतरत्न पुरस्काराने ज्या व्यक्तिमत्वांना सन्मानित केले आहे, त्याचे स्वागत आहे. पण, याबाबतीत प्रामुख्याने दलित व्यक्तींचा तिरस्कार आणि उपेक्षा करणे योग्य नाही. सरकारने याकडेही लक्ष द्यायला हवे’, अशी नाराजीही मायावतींनी व्यक्त केली आहे.  

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मोठ्या प्रतिक्षेनंतर व्ही. पी. सिंह सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले. त्यानंतर दलित आणि उपेक्षितांसाठी कांशीराम यांनीही मोठा संघर्ष केला. ते मसिहा होते. त्यांनाही भारतरत्न देऊन सन्मानित करावे, असे मायावतींनी म्हटले आहे. कांशीराम हे बहुजन समाज पक्षाचे संस्थापक आहेत.

दरम्यान, मायावती यांनी मोदी सरकारने संसदेत सादर केलेल्या व्हाईट पेपरवही टीका केली आहे. तसेच काँग्रेसच्या ब्लॅक पेपरचाही समाचार घेतला आहे. एकमेकांना जनविरोधी सिध्द करण्याचा हा खेळ केवळ राजकीय स्वार्थासाठी सुरू आहे. हे अतिशय दुर्दैवी असल्याची टीका मायावतींनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT