Lok Sabha Election 2024 : आजोबांना भारतरत्न जाहीर होताच छोटे चौधरींचं झालं पक्कं; 'इंडिया'ला बसणार धक्का

Jayant Chaudhary : माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख जयंत चौधरी हे त्यांनी नातू आहेत.
Jayant Chaudhary, Charan Singh
Jayant Chaudhary, Charan SinghSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न जाहीर करत मोदी सरकारने एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या पुरस्काराची घोषणा करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणचं बदलून टाकलं आहे. (Lok Sabha Election 2024)

चरणसिंह यांचे नातू व राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख जयंत चौधरी हे इंडिया आघाडीमध्ये होते. समाजवादी पक्षासोबत त्यांची जागावाटवावर बोलणीही झाली होती. अखिलेश यादव यांनी त्यांना लोकसभेच्या सात जागा देणार असल्याचे जाहीरही केले होते. पण त्यानंतर काही दिवसांतच जयंत चौधरींनी एनडीएसोबत (NDA) बोलणी सुरू असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. आज त्यावर शिक्कामोर्तब झाले. हा इंडिया आघाडीसाठी (India Alliance) मोठा धक्का मानला जात आहे.

Jayant Chaudhary, Charan Singh
Bharat Ratna : मोठी बातमी : नरसिंह राव, चरणसिंह आणि स्वामिनाथन यांना भारतरत्न जाहीर

जयंत चौधरी (Jayant chaudhary) यांना छोटे चौधरी म्हणूनही ओळखले जाते. पश्चिम उत्तर प्रदेशात त्यांचा दबदबा आहे. त्यामुळे अखिलेश यादव यांनी त्यांच्याशी आघाडी केली होती. मागील विधानसभा निवणुकीत त्याचा फायदाही झाला. हेच ओळखून भाजपने (BJP) त्यांच्या आजोबांना भारतरत्न देत टायमिंग साधल्याची चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एनडीएसोबत जाण्याबाबत जयंत चौधरी यांनीही संकेत दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे देशाची नस ओळखत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोणताही पक्ष जे करू शकला नाही, ते मोदींच्या दुरदृष्टीमुळे शक्य झाल्याचे कौतुक चौधरींनी केले. त्यांना लोकसभेच्या दोन आणि राज्यसभेची एक जागा देण्याबाबत भाजपने हिरवा कंदील दाखवल्याची माहिती समोर आली आहे.

जयंत चौधरींमुळे भाजपला पश्चिम यूपीमध्ये मोठा फायदा होऊ शकतो. या भागातील जाट मते नेहमीच चौधरी कुटुंबाचे मागे राहिली आहेत. याच भागातून तीन कृषी कायद्यांविरोधात अनेक शेतकऱ्यांनीही आवाज उठवला होता. आता भारतरत्न जाहीर करत भाजपने जयंत चौधरींसह येथील जाट मतदारांनाही खूश केल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीला आणि प्रामुख्याने अखिलेश यांना मोठा धक्का बसणार आहे.

Jayant Chaudhary, Charan Singh
White Paper News : ‘आदर्श’सह कलमाडींना जेलवारी घडवणाऱ्या घोटाळ्यांवर आज संसदेत प्रहार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com