BSP Chief mayawati removes nephew Akash Anand Sarkarnama
देश

Akash Anand: मायावतींनी अपरिपक्व भाच्याला पदावरून हटवलं; पाच महिन्यापूर्वी केलं होतं उत्तराधिकारी

BSP Chief mayawati removes nephew Akash Anand: गेल्या वर्षी दहा डिसेंबर रोजी मायावतींनी बैठक घेऊन आकाश आनंद हे माझे उत्तराधिकारी असतील, असे बसपाच्या नेत्यांना सांगितले होते.

Mangesh Mahale

बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती (BSP Chief Mayawati) यांनी त्यांचे भाचे आणि बसपाचे उत्तराधिकारी आकाश आनंद यांची पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक पदावरुन हकालपट्टी केली आहे. पाच महिन्यापूर्वी आकाश आनंद (Akash Anand) यांची उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती केली होती.

लंडनमधून एमबीए केलेल्या आकाश आनंद यांनी सात वर्षांपूर्वी राजकारणात प्रवेश केला होता. लोकसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीत आकाश आनंद यांच्याबाबत मायावतींनी घेतलेल्या निर्णयाची चर्चा सुरु आहे. मायावतींनी आकाश आनंद यांच्याकडील सर्व पदे काढून घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून आकाश आनंद यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे ते चर्चेत आले. त्यांच्यावर पक्षाअंतर्गत टीकाही झाली.

आकाश आनंद हे अपरिपक्व असल्याचे सांगत मायावतींनी त्यांच्याकडील पदे काढून घेतली आहे. गेल्या वर्षी दहा डिसेंबर रोजी मायावतींनी बैठक घेऊन आकाश आनंद हे माझे उत्तराधिकारी असतील, असे बसपाच्या नेत्यांना सांगितले होते.

बहुजन समाज पार्टी हा केवळ पक्ष नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कांशीराम यांचा विचार आहे. स्वाभिमान आणि सामाजिक परिवर्तनाची चळवळ म्हणून बसपाकडे पाहिले जाते. हा विचार पुढील पिढीपर्यंत जावा, पक्षाला गती देण्यासाठी आकाश आनंद यांच्याकडे पक्षाने राष्ट्रीय समन्वयक व उत्तराधिकारी म्हणून जाहीर केले होते. पण ते परिपक्व नसल्याने त्यांच्याकडील या दोन्ही जबाबदाऱ्या काढून घेतल्या आहेत. आकाश आनंद यांनी केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT