Dr. Subhash Bhamre: डॉ. भामरे प्रचार सोडून भुजबळांच्या भेटीला; नेमकं काय घडलं?

Dindori Lok Sabha Constituency 2024: डॉ. भामरे यांच्या फ्लेक्स आणि पत्रकांवर भुजबळांचा फोटो नसल्याने समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी तो प्रतिष्ठेचा मुद्दा केला होता. त्यामुळे महायुतीत चांगलाच तणाव देखील निर्माण झाला होता.
Dr. Subhash Bhamre
Dr. Subhash BhamreSarkarnama

Dindori News: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.भाजपच्या प्रचार साहित्यावर फोटो नसल्याने भुजबळ यांचे समर्थक चांगलेच नाराज असल्याचे बोलले जाते. त्यामुळे विविध उमेदवार भुजबळांच्या भेटीला येत असल्याचे चित्र आहे.

दोन आठवड्यांपूर्वी दिंडोरी मतदार संघाच्या (Dindori Lok Sabha Constituency 2024) भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली होती. प्रचाराच्या नियोजनासाठी ही भेट असल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात मात्र दिंडोरी मतदार संघात भुजबळ यांच्या समर्थकांनी भाजपच्या प्रचारासाठी सक्रिय व्हावे, यासाठी ही बैठक झाली होती.

Dr. Subhash Bhamre
Narendra Modi News: मोदींना दिवंगत मुंडेंची आठवण ; म्हणाले, 'उनसे दिल का रिश्ता था...!

त्यानंतर मंगळवारी धुळे मतदार संघाचे भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे (Dr. Subhash Bhamre) यांनीही आपला प्रचार थांबवत नाशिकला येऊन भुजबळांची भेट घेतली. दोन्हीकडून ही भेट सहज असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र डॉ. भामरे यांच्या फ्लेक्स आणि पत्रकांवर भुजबळांचा फोटो नसल्याने समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी तो प्रतिष्ठेचा मुद्दा केला होता. त्यामुळे महायुतीत चांगलाच तणाव देखील निर्माण झाला होता. त्याचा प्रचार व परिणाम होऊ नये म्हणून भामरे यांनी आपला प्रचार थांबवत भुजबळ यांची भेट घेतली.

बंद खोलीत झालेले या भेटीनंतर दोघांनीही महायुतीच्या प्रचाराला प्राधान्य देण्यात येत आहे. समता परिषदेचे कार्यकर्ते देखील डॉ. भामरे यांच्या प्रचारात सक्रिय असल्याचे सांगण्यात आले. एकंदरच राजकीय दृष्ट्या काहीही दावे केले जात असले तरी, भुजबळ यांच्या समर्थकांची नाराजी दूर करण्यासाठी हा दौरा होता हे स्पष्ट झाले आहे.

धुळे आणि दिंडोरी येथील उमेदवारांच्या भेटीनंतर नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे देखील आज सकाळी मंत्री भुजबळांना भेटले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भुजबळ समर्थकांनी सक्रिय व्हावे, अशी विनंती त्यांनी केली. पुढील आठवड्यात पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिक धुळे आणि दिंडोरी या तीन मतदार संघासाठी जाहीर सभा होणार आहे.

या सभेला जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असा पक्षाचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने ही उमेदवारांनी भुजबळ यांच्या भेटीला प्राधान्य दिल्याचे चित्र आहे. एकंदरच भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. मात्र त्यांच्या नावाची चर्चा होत राहील असे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात आहेत.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com