sarkarnama
देश

बसपाने ६७ लाख घेऊनही तिकीट नाकारलेल्या अर्शद राणांची पत्नी कॉग्रेसकडून मैदानात

राणा पती-पत्नीने जमीन आणि दागिने विकून ६७ लाख रुपये बसपाला दिले होते. पण पैसे दिल्यानंतर बसपाने त्यांना तिकीट देण्यास नकार दिला,

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने बहुजन समाज पक्षाचे (BSP) नेता अर्शद राणा (Arshad Rana) यांचा रडण्याचा व्हिडिओ गेल्या आठवड्यात अनेकांनी सोशल मीडियावर पाहिला असेल. याच अर्शद राणांच्या पत्नीला आता कॉग्रेसने तिकीट देऊन बसपाच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

बसपाला ६७ लाख रुपये देऊन तिकीट नाकारलेले अर्शद राणा यांनी थेट पोलिस ठाणे गाठले होते. पैसे दिल्यावर तिकीट देण्याचे आश्वासन बसपाने पैसे मिळाल्यावर पूर्ण केले नाही. हताश होऊन अर्शद राणांनी रडत ही बाब माध्यमांना सांगितली होती.

आता त्यांची पत्नी यास्मीन राणा यांना कॉग्रेसने मैदानात उतरविले आहे. यास्मीन या मुजफ्फरनगरमधील चरथावल विधानसभा लढविणार आहेत. कॉग्रेसने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत यास्मीन यांचे नाव आहे. या यादीत ४१ जणांचे नाव असून यात १६ महिलांचा समावेश आहे. ''बसपा आणि अन्य पक्षाच्या उमेदवारांना पराभूत करुन कॉग्रेसला विजयी करु,'' असा निर्धार अर्शद राणा यांनी माध्यमांशी बोलतांना केला.

बसपाकडून तिकीट मिळण्यासाठी राणा पती-पत्नीने जमीन आणि दागिने विकून ६७ लाख रुपये बसपाला दिले होते. पण पैसे दिल्यानंतर बसपाने त्यांना तिकीट देण्यास नकार दिला, असा आरोप राणा यांनी केला आहे.

गेल्या आठवड्यात अर्शद राणा यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. आपले ६७ लाख रुपये बसपाने परत करावे, अशी मागणी त्यांनी तक्रारीत केली आहे. पैसे परत मिळाले नाही तर आपण बसपाच्या प्रमुख मायावती यांच्या घरासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

मुजफ्फरनगर येथील यास्मीन या व्यवसायाने डॅाक्टर आहेत. त्या गरीब लोकांवर मोफत उपचार करतात, गरजू मुलांच्या शिक्षणाचा खर्चही त्या करीत असतात. आता अर्शद आणि यास्मीन यांच्या सोशल मीडिया अकाउंटस वर कॉग्रेसच्या नेत्यांचे फोटो झळकले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT