मोठी बातमी : 'ग्लोबल टिचर' डिसले गुरुजींवर कारवाईची प्रक्रिया सुरु

तीन वर्षांच्या काळात रणजित सिंह डिसले गुरुजींनी काय केलं? याबाबत चौकशी समितीचा अहवाल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झाला आहे.
Ranjit Singh Disley
Ranjit Singh Disley Sarkarnama
Published on
Updated on

पुणे : डिसले गुरुजी यांना पी एच डी करण्यासाठी अमेरिकेत जायचे आहे. यासाठी त्यांनी सोलापूर शिक्षण विभागाकडे 6 महिन्यांच्या रजेसाठी अर्ज केला होता. मात्र, त्यांच्या अर्जात त्रुटी असल्याचे कारण शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहे. तर, त्यांच्यावर काही गंभीर आरोपही करण्यात आले आहेत.

यामध्ये ते गेल्या तीन वर्षापासून शाळेकडे फिरकले नाही. त्यांनी तीन वर्षात काय केल याबाबतच्या चौकशीसाठीही समिती नेमली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सोलापूर शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले होते. आज त्यांच्यावरील कारवाई सुरु करण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी एका वृत्तवाहिनीला आज दिली. दरम्यान डिसले गुरुजी राजीनामा देण्याच्या मनस्थिती आहेत.

Ranjit Singh Disley
पोलिस दलातील भ्रष्टाचार उघड करणारे पोलिस उपनिरीक्षक सुनिल टोके निंलबित

तीन वर्षांच्या काळात रणजित सिंह डिसले गुरुजींनी काय केलं? याबाबत चौकशी समितीचा अहवाल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झाला असून त्यांच्यावर शिक्षण अधिकाऱ्यांनी गंभीर आरोप केले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी शाळेची ज्या डिसले गुरुजीमुळे (Ranjit Singh Disley) जगाला ओळख झाली, ते डिसले गुरजी येत्या दोन ते तीन दिवसांत आता राजीनामा देणार असल्याच त्यांनी जाहीर केल आहे. ज्या व्यवस्थेमध्ये आपल्या कामाचा आदर केला जातं नाही, अशा ठिकाणी काम करण्याच्या मानसिकतेमध्ये मी सध्या नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, डिसले गुरुजींनी अमेरिकेत पी एच डी (PHD) करण्यासाठी सोलापूर शिक्षण विभागाकडे 6 महिन्यांची रजा मागितली होती, त्याला सोलापूर जिल्हा परिषद शिक्षाण विभागाकडून त्रुटी आहेत, असे सांगून नकार देण्यात आला होता.

Ranjit Singh Disley
रामदास कदमांच्या हातातून दापोलीपाठोपाठ मंडणगडही जाणार

डिसले गुरूजी म्हणाले, काम करण्यासाठी एक विश्वासाच वातावरण असाव लागत. मात्र, कामाची दखल न घेता अपमानास्पद वागणूक मिळत आहे. यामुळे माझ्या संयमाला सुद्धा मर्यादा आहेत. ज्या ठिकाणी आपल्या कामाचा आदर केला जात नाही त्या ठिकाणी मी काम करण्याच्या मानसिकतेमध्ये मी नाही. मला अमेरिकेत पी एच डी करण्यासाठी जायचे आहे. त्यासाठी सोलापूर शिक्षण विभागाकडे 6 महिन्यांच्या रजेसाठी रजा करण्यात आला होती. मात्र, माझ्या अर्जावर निर्णय घेण्याऐवजी माझ्यावर विविध आरोप केले जात आहे. मला अमेरिकेत जाऊन शिकता आले तर माझ्या शाळेतील व देशातील विद्यार्थ्यांना फायदा होईल. परंतू माझ्या प्रामाणिकपणावरच संशय घेतला जात असल्याने माझ्यासमोर राजीनामा देण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे डिसले यांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com