Mayawati Sarkarnama
देश

Mayawati : वाढदिवशी मायावतींचा मास्टरस्ट्रोक; लोकसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा

Lok sabha Election : निवडणुकीत कुणाला साथ देणार याबाबत होती उत्सुकता...

Rajanand More

BSP News : बहुजन समाज पक्षाला इंडिया आघाडीत घेण्यावरून मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू होती, पण याबाबत पक्षाच्या प्रमुख मायावती एकदाही वक्तव्य केले नव्हते. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मायावतींच्या समावेशाला आडकाठी आणली होती, तर मायावतींनी अखिलेश यांच्यावर शरसंधान साधले होते. त्यामुळे त्यांच्या इंडिया आघाडीतील समावेशाबाबत तर्कवितर्क लढवले जात होते.

मायावतींनी (Mayawati) अखेर आपल्या वाढदिवशी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी मीडियाशी बोलताना भाजप (BJP) सरकारसह सर्व विरोधी पक्षांवर टीकास्त्र सोडत आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) स्वतंत्रपणे लढणार असल्याचे जाहीर केले. या निवडणुकीत बसपा कोणत्या आघाडी किंवा पक्षासोबत निवडणुकीत उतरणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे इंडिया आघाडीच्या प्रयत्नांना धक्का बसल्याचे मानले जात आहे.

कोणत्याही पक्षासोबत आघाडी केल्यानंतर पक्षाच्या मतांची टक्केवारी कमी होत असल्याचे मायावती यांनी म्हटले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार पूर्ण ताकदीने सर्व विरोधी पक्षांसमोर उभे ठाकतील, असा विश्वास मायावतींनी व्यक्त केला. मायावतींच्या या निर्णयामुळे उत्तर प्रदेशातील कुणाला तोटा आणि कुणाला फायदा होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मायावती यांना सोबत घेण्याबाबत काँग्रेस (Congress) आग्रही होते, पण अखिलेश यांनी खोडा घातला होता. मायावती इंडियामध्ये आल्या असत्या तर मतविभाजन टाळता आले असते. याचा थेट फटका भाजपला बसला असता, असे गणित काँग्रेसकडून मांडले जात होते, पण आता मायावतींच्या निर्णयामुळे उत्तर प्रदेशात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अखिलेश आणि मायावती यांनी सातत्याने एकमेकांविरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्षे राज्यात लोकसभा निवडणुकीत एकत्रित येणार का, याबाबत उत्सुकता होती. मागील विधानसभा व लोकसभा निवडणुकीत बसपाचा सुपडासाफ झाला होता, पण त्यांच्या मतांची टक्केवारी अजूनही लक्षणीय आहे. त्याचाच फायदा इंडिया आघाडीला घ्यायचा होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT