Budget 2023 News | Nirmala Sitaramana Sarkarnama
देश

Budget 2023 News : कोरोनाकाळात एकही जण उपाशी राहिला नाही, 80 करोड गरिबांना धान्य : सीतारमण यांचा दावा!

Budget 2023 News : 2022 मध्ये UPI द्वारे 126 लाख कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचे त्यांनी आज सांगितले.

सरकारनामा ब्यूरो

Budget 2023 News : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी आज संसदेत 2023 चा अर्थसंकल्प सादर केला आहे. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सीतारमण म्हणाले, "कोविड-19 महामारीच्या काळात केंद्र सरकारने 80 कोटी गरीब लोकांना मोफत अन्नधान्य वितरीत केले. देशातील एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही, याची काळजी घेतली." असा दावा त्यांनी केला.

सीतारमण म्हणाले की, "जागतिक आव्हानांच्या वेळी, G-20 परिषेदेचे अध्यक्षपद मिळवून जागतिक व्यवस्थेत भारताची भूमिका मजबूत करण्याची संधी आपल्याकडे आहे.ते पुढे म्हणाले, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAYA) अंतर्गत सरकार गरीब लोकांना मोफत अन्नधान्य देण्याची योजना राबवत आहे, ज्यावर सरकारने १ जानेवारीपासून २ लाख कोटी रुपये खर्च केले जातील.

2020-21 मध्ये कृषी क्षेत्रातील खाजगी गुंतवणूक वाढ होऊन 9.3 टक्के झाली आहे, जी मागे म्हणजे 2019-20 मध्ये सात टक्के होती. पहिल्यांदाच अर्थमंत्री निर्मला सीतारामन लाल टॅब्लेट घेऊन अर्थसंकल्प सादर करण्यासाठी संसद भवनात पोहोचले होते. त्यांनी या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे.

अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी वंचित व दुर्बल प्राधान्य दिल्याचे सांगितले. कृषी क्रेडिट कार्ड 20 लाख कोटींनी वाढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. पंतप्रधान मत्स्य योजनेसाठी 6,000 कोटी रुपये दिले जातील. 2022 मध्ये UPI द्वारे 126 लाख कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचे त्यांनी आज सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT