Bullock cart race 

Sarkarnama

देश

Bullock Cart Race : बैलगाडा शर्यतीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी : निकालाकडे बैलगाडा प्रेमींचे लक्ष!

Bullock Cart Race : शेतकरी आणि बैलगाडाप्रेमींना निर्णयाची प्रतीक्षा

सरकारनामा ब्यूरो

दिल्ली : महाराष्ट्रातील शेतकरी आणि बैलगाडाप्रेमींच्या जिव्हाळ्याचा बैलगाडा शर्यतीची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आज आहे. अनेक दिवसांपासून न्यायालयीन प्रक्रियेत असलेल्या बैलगाडा प्रकरणावर आज न्यायालयाकडून काय निर्णय येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणावर आज सुनवाणी होत असताना महाराष्ट्र सरकारकडून ॲड. तुषार मेहता युक्तिवाद करणार आहेत, राज्य सरकारची ते बाजू मांडणार आहेत. यावेळी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेकडून ॲड. गौरव अग्रवाल युक्तिवाद करणार आहेत. यावेळी सुनावणी दरम्यान अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष नितीन आबा शेवाळे, सोबतच संदीप बोदगे, रामकृष्ण टाकळकर हे देखील उपस्थित राहणार आहेत.

न्यायमूर्ती केएम जोसेफ, न्यायमूर्ती अजय रस्तोगी, न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस, न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय, न्यायमूर्ती सी. टी. रविकुमार यांच्या घटनापीठासमोर होणार सुनावणी. गेल्या सुनावणीत ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ॲाफ इंडिया ही संस्थेनेसुद्धा बैलगाडी शर्यतीवर सकारात्मक भूमिका घेतली आहे. बैलगाडी शर्यतीला बंदी घालण्याची गरज नाही, असं प्रतिज्ञापत्र ॲनिलम वेल्फेअर बोर्डानं न्यायालयात दाखल केले आहे.

आजच्या न्यायालयाच्या निर्णयावकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषत: बैलगाडाप्रेमी व शेतकरी न्यायालयाच्या निर्णयाकडे आस लावून बसले आहेत. आज काय निर्णय घेतला जातो ते काही वेळातच स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT