Bullock Cart Race : बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु होणार ; पहिल्याच सुनावणीत अॅनिमल बोर्डाने न्यायालयात सांगितले..

Bullock Cart Race : राज्य सरकारने सक्षम कायदे व नियम अटी केल्याने त्या कायद्याची अमलबजावणी करावी असे सांगून शर्यतींना विरोध नसल्याचे या बोर्डाने आज सांगितले.
 Bullock Cart Race
Bullock Cart Race sarkarnama
Published on
Updated on

Bullock Cart Race : बैलगाडाशर्यत बंदीविरोधातील दाखल याचिकेवरील अंतिम सुनावणी गुरुवारी (ता.२४)सर्वोच्च न्यायालयात सुरु झाली. या शर्यतीला अगोदर केंद्रीय प्राणी कल्याण मंडळाने (ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया) विरोध केला होता, यावेळी, मात्र विरोध नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्र म्हटलं आहे. त्यामुळे ही शर्यत पुन्हा सुरु होण्यातील मुख्य अडथळा आता दूर झाला आहे.

महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत,तामिळनाडूतील जल्लीकटू व रेकला रेस, तर कर्नाटकमधील कंबाला शर्यतीवर त्या राज्यांनी केलेल्या कायद्यांबाबत सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी सुरु झाली. आता ती येत्या मंगळवारी होणार आहे. एक,दोन आठवडे ती चालण्याची शक्यता आहे.

न्यायमूर्ती केएम जोसेफ,अजय रस्तोगी, अनिरुद्ध बोस,ऋषिकेश रॉय आणि सी टी रविकुमार या घटनापीठासमोर बैलगाडा शर्यतींना विरोध करणाऱ्या क्युपा (CUPA)संघटनेकडून ॲड सिद्धार्थ लुथ्रा यांनी युक्तिवाद केला .

ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाने प्रतिज्ञापत्र सादर केले. या बोर्डाने यापूर्वी बैलगाडा शर्यतीला विरोध केल्याने तीवर बंदी आली होती. मात्र, आता राज्य सरकारने सक्षम कायदे व नियम अटी केल्याने त्या कायद्याची अमलबजावणी करावी असे सांगून शर्यतींना विरोध नसल्याचे या बोर्डाने आज सांगितले.

 Bullock Cart Race
Shahaji Bapu Patil : शिंदे - फडणवीस असेपर्यंत मला करूनच दाखवायचं ! ; शहाजीबापू पाटलांचा निर्धार

यावेळी भोसरीचे आमदार महेश लांडगे,अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष नितीनआबा शेवाळे,संदीप बोदगे,रामकृष्ण टाकळकर,विश्वास बुट्टे पाटील आणि राज्य शासनाचे सबंधित अधिकारी हे पूर्व तयारीसाठी उपस्थित होते.

 Bullock Cart Race
Udayanraje Bhosale : पवार, गडकरींनी कोश्यारींवर तेव्हा आक्षेप का घेतला नाही ; उदयनराजेंचा सवाल

महाराष्ट्र सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, सिनियर कौन्सिल सिद्धार्थ भटनागर,दिल्लीतील राज्य सरकारचे वकील ॲड सिद्धार्थ धर्माधिकारी,ॲड आदित्य पांडे,ॲड अभिकल्प प्रतापसिंह,ॲड श्रीरंग वर्मा हे,तर बैलगाडा संघटनेकडून ॲड आनंद लांडगे,सिनियर कौन्सिल गौरव अग्रवाल हे युक्तिवाद करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com