Yogi Adityanath, PM Narendra Modi Sarkarnama
देश

Cabinet Expansion News : लोकसभेच्या तोंडावर योगींची खेळी; मंत्रिमंडळाचा विस्तार करत मित्रपक्षांना गोंजारलं

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील सर्व 80 जागा जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यासाठी मित्रपक्षांना खूष केले जात आहे.

Rajanand More

Uttar Pradesh News : लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. भाजपसाठी उत्तर प्रदेश हे महत्त्वाचे राज्य असून, सर्व 80 जागा जिंकण्यासाठी पक्षाने कंबर कसली आहे. त्यासाठी मित्रपक्षांना खूष केले जात आहे. आज योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिल्यांदाच विस्तार (Cabinet Expansion News) करण्यात आला. यामध्ये मित्रपक्षांतील दोन आमदारांसह भाजपच्या दोन आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.

राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. सुहेलदेव भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल या मित्रपक्षांना सरकारमध्ये मंत्रिपद देण्यात आले आहे. या पक्षातील अनुक्रमे ओमप्रकाश राजभर आणि अनिल कुमार तर भाजपचे (BJP) दारा सिंह चौहान आणि सुनील शर्मा यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली.

चौघांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभर यांच्या पक्षाचा प्रभाव राज्यात पूर्वांचल भागात आहे. त्यांनी पाच वर्षांपूर्वी भाजपची साथ सोडली होती. त्यानंतर पुन्हा मागील वर्षी 16 जुलैला एनडीएमध्ये दाखल झाले. तेव्हापासून मंत्रिपदासाठी ते आग्रही होते. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पूर्वांचल भागात फटका बसला होता. या निवडणुकीत राजभर हे समाजवादी पक्षासोबत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रीय लोकदलानेही काही दिवसांपूर्वीच इंडिया आघाडीतून (India Alliance) बाहेर पडत भाजपला साथ दिली आहे. पक्षाचे प्रमुख जयंत चौधरी (Jayant Chaudhary) यांच्या आजोबांना भारतरत्न (Bharat Ratna) पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच त्यांनी समाजवादी पक्षाची (Samajwadi Party) साथ सोडली. त्यामुळे अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांना धक्का बसला.

राजभर आणि चौधरी यांच्या पक्षांमुळे भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर त्यांची नाराजी पक्षाला परवडणारी नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी एका आमदाराला मंत्रिपद देऊन खूष करण्यात आले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीतही त्यांना एक-दोन जागा दिल्या जाऊ शकतात, अशी चर्चा आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT