Abhijit Gangopadhyay News : न्यायाधीशपदाचा राजीनामा देताच केलं भाजप अन् मोदींचं कौतुक; म्हणाले...

BJP Political News : गंगोपाध्याय यांनी आधीच जाहीर केल्याप्रमाणे आज सकाळी न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला. गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Abhijit Gangopadhyay, PM Narendra Modi
Abhijit Gangopadhyay, PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

West Bengal News : मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अभिजित गंगोपाध्याय (Abhijit Gangopadhyay News) यांनी अखेर आज न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला. ते पश्चिम बंगाल हायकोर्टात न्यायाधीश होते. पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकारणात प्रवेश करणार असल्याचे जाहीर करत त्यांनी पहिली पसंती भाजपला असेल असे सांगितले. शुक्रवारी भाजपमध्ये दाखल होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गंगोपाध्याय यांनी आज राजीनामापत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांना पाठवले. त्याचप्रमाणे सरन्यायाधीश डी. वाय चंदचूड (Dhananjay Chandrachud) आणि कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना राजीनामापत्राची प्रत पाठवली आहे. त्यानंतर त्यांनी काहीवेळात मीडियाशी संवाद साधताना आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली.

Abhijit Gangopadhyay, PM Narendra Modi
DK Shivakumar News : सुप्रीम कोर्टाकडून ‘ईडी’ला दणका; काँग्रेस संकटमोचक शिवकुमारांवरील ‘ती’ केस रद्द

आपण भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याचे सांगताना गंगोपाध्याय म्हणाले, माझे येथील काम पूर्ण झाल्याने मी न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला. बंगालमधील (West Bengal) सत्ताधारी पक्षातील बहुतेक सदस्य अज्ञानी आहेत. त्यामुळेच ते आपल्यावर टीका करतात. ते काय म्हणतात याला मी महत्त्व देत नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजप हा तृणमूल काँग्रेस (TMC) आणि काँग्रेसपेक्षा चांगला पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खूप चांगले नेते आहेत, असे सांगताना गंगोपाध्याय यांनी टीएमसीवर निशाणा साधला. ते म्हणाले, तृणमूल हा राजकीय पक्ष नाही. तो एक क्लब आहे, तर काँग्रेस (Congress) हा कौटुंबिक जमीनदारांचा पक्ष आहे. टीएमसीपेक्षा काँग्रेस आणि भाजप चांगला आहे. मी आतापर्यंत पाहिलेल्या पक्षांमध्ये टीएमसी हा सर्वात भयानक पक्ष आहे.

लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढण्याबाबत बोलताना गंगोपाध्याय यांनी सूचक विधान केले. भाजपमध्ये सात तारखेला प्रवेश करणार आहे. त्यानंतर पक्षाकडून आपल्यावर कोणती जबाबदारी द्यायची हे ठरवले जाईल, असे त्यांनी सांगितले.

R

Abhijit Gangopadhyay, PM Narendra Modi
Lok Sabha Election 2024 : मैदान तुम्ही निवडा, कार्यकर्ता आम्ही निवडतो! इराणींचे राहुल गांधींना चॅलेंज

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com