CM Mamata Banerjee Sarkarnama
देश

TMC news : आमदार-खासदार गेले, पण ममतादीदींच्या हाती लागला खजाना; हायकोर्टाचा बंडखोरांना झटका...

TMC bank accounts, Calcutta High Court : हायकोर्टाने ममता बॅनर्जी यांना पक्षाच्या दैनंदिन खर्चासाठी खात्यातील मर्यादीत पैसे वापरण्यास परवानगी दिली.

Rajanand More

Mamata Banerjee news : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हातातून तृणमूल कांग्रेस पक्ष जाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तब्बल ६० हून आमदारांसह २० खासदारांनी बंड करत पक्षावर दावा सांगितला आहे. एकीकडे आमदार-खासदारांसह पक्षही ताब्यातून जाणार असल्याची भीती असतानाचा गुरूवारी ममतादीदींनी मोठा दिलासा मिळाला आहे.

आमदार-खासदार सोडून गेले असले तरी ममता बॅनर्जी यांच्याकडे कोट्यवधी रुपये असलेली बँक खाती असणार आहेत. गुरूवारी कोलकाता हायकोर्टानेच तसे आदेश दिले. तृणमूल काँग्रेसच्या तीन बँक खात्यांवर मर्यादित स्वरुपात व्यवहार करण्याची परवानगी हायकोर्टाने दिली. पक्ष खिळखिळा झाल्यानंतर ममतादीदींसाठी हा मोठा दिलासा तर बंडखोर लोकप्रतिनिधींना धक्का मानला जात आहे.

बँक खात्यातील व्यवहारांवर निगराणीसाठी हायकोर्टाने एक विशेष अधिकारीही नियुक्त केला आहे. व्यवहाराचे अधिकार केवळ ममता बॅनर्जी यांच्या गटाला मिळाले आहेत. न्यायमूर्ती सौगत भट्टाचार्य यांच्या खंडपीठाने निवृत्त न्यायमूर्ती सुब्रता तालुकदार यांची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडून तृणमूलच्या दोन पदाधिकाऱ्यांना धनादेशावर हस्ताक्षर करण्यासाठी अधिकृत केले जाईल.

तृणमूलचे माजी कोषाध्यक्ष अरुप बिस्वास यांनी बँकेला पत्र लिहून खात्यांमधील व्यवहार गोठविण्याची मागणी केली होती. त्यानंतर बँकेकडून व्यवहार थांबविण्यात आले होते. तसेच बुधवारी ईडीनेही ही खाती सील केली होती. मात्र, गुरूवारी हायकोर्टाने ममता बॅनर्जी यांना पक्षाच्या दैनंदिन खर्चासाठी खात्यातील मर्यादीत पैसे वापरण्यास परवानगी दिली. खाती फ्रीज करण्यासाठी पोलिसांनी दाखविलेले पुरावे पुरेसे नाहीत, असे हायकोर्टाने स्पष्ट केले. पोलिसांनी बँक खात्यांमधील अनियमितेवरून १८ जून रोजी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर १९ जूनला व्यवहार गोठविण्यात आले होते.ं

'असली' टीएमसी कोणती?

बँक खात्यावरून व्यवहार करण्याची परवानगी ममता बॅनर्जी यांच्या गटाला मिळाली असली तरी हा निर्णय म्हणजे असली तृणमूल काँग्रेस म्हणून मान्यता नव्हे. हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे, असे कोर्टाने स्पष्ट केले. काँग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी कोर्टात तृणमूल काँग्रेसची बाजू मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT