Doctor assault news : मारहाण प्रकरणाला धक्कादायक वळण; महिला डॉक्टरसह दोघांचे राजीनामे, नगरसेवकाला झालीय अटक

KDMC Hospital, Shastrinagar Hospital, Ramesh Mhatre : काही विद्यमान व माजी डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, स्थानिक पातळीवरील राजकीय हस्तक्षेप, डॉक्टरांवरील दबाव आणि वारंवार उद्भवणारे वाद यामुळे अनेक डॉक्टर या रुग्णालयात दीर्घकाळ सेवा देण्यास इच्छुक नसतात.
Doctor assault news
Doctor assault newssarkarnama
Published on
Updated on

KDMC news : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण प्रकरणाचे पडसाद आता अधिक तीव्र होताना दिसत आहेत. मारहाणप्रकरणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना बुधवारीच (ता. ८) अटक झाली आहे. मात्र, आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मारहाण झालेल्या दोन डॉक्टरांनी बाह्यस्त्रोत संस्थेकडे तडकाफडकी राजीनामे सादर केल्याची माहिती महापालिकेतील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

मारहाणीच्या घटनेमुळे डॉक्टरांच्या सुरक्षिततेबरोबरच महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेतील कार्यपद्धती आणि रुग्णालयांतील वातावरणावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, डॉ. सृष्टी महेंद्र बाविस्कर आणि डॉ. वैभव नामदेव साळुंखे यांनी आपल्या नियंत्रक बाह्यस्त्रोत संस्थेकडे राजीनामे सादर केले आहेत. डॉ. साळुंखे हे बीएएमएस असून मागील चार महिन्यांपासून शास्त्रीनगर रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. तर डॉ. बाविस्कर या निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावत होत्या.

मारहाणीची घटना, कुटुंबीयांबाबत करण्यात आलेली कथित अश्लील शिवीगाळ, त्यानंतर सुरू झाल्याचे सांगितले जाणारे धमकीचे फोन आणि संदेश यामुळे दोन्ही डॉक्टर मानसिकदृष्ट्या खचल्याची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून समाजसेवेच्या उद्देशाने रुग्णालयात दाखल झालेल्या डॉक्टरांना अशा प्रकारच्या अनुभवाला सामोरे जावे लागल्याने त्यांनी सेवा सोडण्याचा निर्णय घेतल्याचे संबंधित कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

Doctor assault news
Shaktipeeth Highway : आंदोलन पेटणार! तीव्र विरोधानंतरही 'शक्तीपीठ'साठी जमीन अधिग्रहणाची अधिसूचना जारी

दोन्ही डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला असता तो होऊ शकला नाही. मात्र, बाह्यस्त्रोत संस्थेतील सूत्रांनी राजीनामे प्राप्त झाल्याची माहिती दिली. याबाबत केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी सांगितले की, "दोन्ही डॉक्टर बाह्यस्त्रोत संस्थेचे आहेत. त्यांनी राजीनामे दिल्याची माहिती आहे. मात्र, त्यांचे अधिकृत राजीनामे अद्याप महापालिकेकडे प्राप्त झालेले नाहीत."

दरम्यान, या घटनेनंतर शास्त्रीनगर रुग्णालयातील वातावरणाबाबतही विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. काही विद्यमान व माजी डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, स्थानिक पातळीवरील राजकीय हस्तक्षेप, डॉक्टरांवरील दबाव आणि वारंवार उद्भवणारे वाद यामुळे अनेक डॉक्टर या रुग्णालयात दीर्घकाळ सेवा देण्यास इच्छुक नसतात. तथापि, या दाव्यांबाबत संबंधित लोकप्रतिनिधींची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

Doctor assault news
Vedant Bandgar case : लेकाच्या खुनातील तो संशयित निष्पाप! वेदांत बंडगरच्या वडिलांनीच पोलिसांकडे दया दाखविण्याची विनंती केल्याने खळबळ

काही डॉक्टरांनी असा दावाही केला की, रुग्णालय परिसरात अनेक वर्षांपासून काही समाजकंटकांचा मुक्त वावर असल्याच्या तक्रारी वेळोवेळी करण्यात आल्या. रात्रीच्या वेळी रुग्णालय परिसरात अनधिकृत वावर, रुग्णालयाच्या जागेचा गैरवापर आणि कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन होत असल्याचे आरोप करण्यात आले. मात्र, या आरोपांची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी झालेली नाही.

डॉक्टरांच्या सुरक्षिततेबरोबरच निवासी सुविधांचाही प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रुग्णालय परिसरात निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा सुविधा नसल्याने बाहेरून येणारे डॉक्टर येथे दीर्घकाळ टिकत नसल्याची चर्चा वैद्यकीय वर्तुळात आहे. महापालिकेने अलीकडेच शंभर डॉक्टरांच्या भरतीसाठी मुलाखती घेतल्या असताना अत्यल्प उमेदवार उपस्थित राहिल्याचेही सांगितले जात आहे.

शास्त्रीनगर रुग्णालयातील मारहाणीची घटना राज्यभर गाजल्यानंतर डॉक्टर संघटनांमध्ये अस्वस्थता वाढली असून, सरकारी आणि महापालिका रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन, राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणा कोणती भूमिका घेतात, याकडे वैद्यकीय क्षेत्रासह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com