Justin Trudeau News  Sarkarnama
देश

Canada-India Dispute: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंचा पुन्हा भारत द्वेष; हिंदूंचं प्रतीक स्वस्तिक चिन्हाला म्हटलं...

Justin Trudeau News : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले.

Ganesh Thombare

Delhi News: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी अद्यापही भारताविरोधात वक्तव्ये करण्याचे सोडलेले नाही. त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून दोन्ही देशातील वातावरण बिघडवण्याचे काम केले आहे. त्यांनी हिंदूंचे प्रतीक पवित्र 'स्वस्तिक' हे द्वेष पसरवणारे चिन्ह असल्याचे सांगत वादात भर पाडली आहे. सोशल मीडिया 'एक्स'वर ट्रुडो यांनी लिहिले की, द्वेष, तिरस्कार पसरवणाऱ्या चिन्हांना संसदेजवळ प्रदर्शित करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही.

त्यांनी टि्वटमध्ये म्हटले की, "जेव्हा आपण एखादी घृणास्पद भाषा किंवा दृश्य पाहतो किंवा ऐकतो तेव्हा आपण त्याचा निषेध केला पाहिजे. पार्लमेंट हिलवर एखाद्या व्यक्तीकडून होणारे 'स्वस्तिक'चे प्रदर्शन कोणत्याही परिस्थितीत आम्हाला मान्य नाही. कॅनडाच्या नागरिकांना शांततेत एकत्र येण्याचा अधिकार आहे. परंतु, आम्ही ज्यूविरोधी भावना, इस्लामफोबिया किंवा कोणत्याही प्रकारचा द्वेष, तिरस्कार सहन करणार नाही ".

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ट्रुडो यांच्या या ट्िवटचा सोशल मीडियावर समाचार घेतला जात आहे. अनेक युजर्सनी 'स्वस्तिक' चिन्ह हे पवित्रतेचे प्रतीक आहे, तर नाझींचे चिन्ह 'हेकेनक्रूज' हे द्वेषाचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे. ट्रुडो यांना यामुळे ट्रोल केले जात आहे. काही दिवसांपूर्वीच ट्रुडो यांनी संसदेत एका नाझी युद्ध गुन्हेगाराला सन्मानित केले होते. त्यावेळी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यामुळे कॅनडाच्या सभापतींना राजीनामाही द्यावा लागला होता.

जस्टिन ट्रुडो यांनी त्यांच्या संसदेत शीख दहशतवादी हरदिपसिंग निज्जरच्या हत्येचा आरोप भारतावर केला होता. तेव्हापासून दोन्ही देशांच्या संबंधात तेढ निर्माण झाली आहे. ट्रुडो खलिस्तानी दहशतवाद्यांचे समर्थक मानले जातात. ते गेल्या काही दिवसांपासून हिंदूंचे प्रतीक 'स्वस्तिक' चिन्हावर बंदी घालण्याच्या विचारात आहेत. परंतु, त्यांना अद्याप यावर निर्णय घेता आलेला नाही. कॅनडाच्या संसदेत याबाबत एक विधेयकही सादर करण्यात आलेले आहे.

Edited By - Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT