News Delhi News : खलिस्तानी दहशतवादी हरदीप निज्जरच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप करणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना मोठा धक्का बसला आहे. कॅनडाला हा धक्का अमेरिकेच्या गोटातून बसला आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री एंटनी ब्लिंकन आणि भारताचे उच्चपदस्थ अधिकारी एस जयशंकर यांची गुरुवारी भेट झाली. या भेटीवेळी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन भारताला हरदीप निज्जरच्या हत्येवरून सुनावतील अशी शक्यता होती. मात्र, अमेरिकेने याबाबत ब्र शब्दही काढला नसल्याने अमेरिकेने कॅनडाच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. (Latest Marathi News)
खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारत सरकारचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला होता. भारताने कॅनडाचा आरोप फेटाळून लावताना हा आरोप निरर्थक असल्याची टीका केली होती.
भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध तणावपूर्ण असतानाच गुरुवारी अमेरिकेचे विदेश मंत्री ब्लिंकन व जयशंकर यांच्याशी चर्चा केली आहे. या वेळी निज्जर याच्या खूनप्रकरणी अमेरिकेने कॅनडाला मोठा झटका दिला. या प्रकरणी ब्लिंकन यांनी भारताचे उच्चपदस्थ अधिकारी एस. जयशंकर यांच्याकडे काहीच विचारणा केली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे लगेचच याचा परिणाम कॅनडावर झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात कॅनडाने काहीशी नरमाईची भूमिका घेतली असून, पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा सूर बदलला आहे. भारतासोबत येत्या काळात चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. येत्या काळात भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी कॅनडा कटिबद्ध आहे. येत्या काळात दोन्ही देशांदरम्यानचे संबंध सुधारतील. त्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्याची तयारीही कॅनडाने दर्शवली आहे.
(Latest Marathi News)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.