rahul gandhi sarkarnama
देश

Rahul Gandhi : राहुल गांधींचं टेन्शन वाढलं, भारतीय नागरिकत्व राहणार की जाणार? 'या' नेत्याची याचिका, पुढच्या आठवड्यात फैसला

Rahul Gandhi Vs Subramanian Swamy : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं भारतीय नागरिकत्व रद्द करण्यात यावं, अशी याचिका भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात केली आहे.

Jagdish Patil

New Delhi News, 16 August : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचं भारतीय नागरिकत्व रद्द करण्यात यावं, अशी याचिका भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात केली आहे.

तसंच गृहमंत्रालयाने राहुल गांधी यांचे नागरिकत्व रद्द करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी देखील त्यांनी याचिकेत केली आहे. त्यामुळे आता राहुल गांधींच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंग्लडचं नागरिकत्व स्वीकारलं होतं. याच नागरिकत्वाच्या मुद्द्यावर आक्षेप घेत आता त्यांचे भारतीय नागरिक्तव रद्द करावं अशी मागणी सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी केली आहे. शिवाय यासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर पुढच्या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता असून या याचिकेवर न्यायालय काय निर्णय देणार? आणि या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्रालयाची भूमिका देखील महत्वाची आहे. त्यामुळे गृहमंत्रालय नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

राहुल गांधींकडे इंग्लडचा पासपोर्ट

तर याचिकेत राहुल गांधी (Rahul Gandhi) हे ब्रिटीश नागरीक असून त्यांच्याकडे इंग्लडचा पासपोर्ट असल्याचा दावा करण्यात आला आहे. या संदर्भात कोर्टाने केंद्र सरकारकडून स्टेटस रिपोर्ट मागवावा अशी मागणी करण्यात आली आहे. तर राहुल गांधींच्या नागरिकत्वाबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तक्रार केली होती. मात्र त्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नसल्याचंही याचिकेत म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT