Uddhav Thackeray: 'मविआ'च्या महामेळाव्यात उद्धव ठाकरेंचं तोंडभरुन कौतुक; कोण काय म्हणाले...

Political News : उद्धव ठाकरे यांनी यावेळी ओघवत्या शैलीत उपस्थितांना खिळवून ठेवणारे भाषण केले. त्यांच्या भाषणाला धार होती, त्यात त्यांनी महत्वाचे मुद्दे मांडत उपस्थितांचे मने जिंकली.
Varsha Gaikwad, Supriya Sule, Uddhav Thackeray
Varsha Gaikwad, Supriya Sule, Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबईत महाविकास आघाडीचा शुक्रवारी मेळावा झाला. या मेळाव्यातून महाविकास आघाडीने प्रचाराला सुरुवात करून आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. या मेळाव्याला शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले यांच्यासह तिन्ही पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी यावेळी ओघवत्या शैलीत उपस्थितांना खिळवून ठेवणारे भाषण केले. त्यांच्या भाषणाला धार होती, त्यात त्यांनी महत्वाचे मुद्दे मांडत उपस्थितांचे मने जिंकली.

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून कोणतेही नाव जाहीर करा, माझा पाठिंबा असेल, अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केली. या मेळाव्यातून पुन्हा एकदा ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना टीका करीत शिंगावर घेतले. त्यामुळेच महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उपस्थित असलेल्या अनेक नेतेमंडळींनी उद्धव ठाकरेंवर कौतुकाचा वर्षाव केला. ठाकरेंचे खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), खासदार वर्षा गायकवाड, नसीम खान यांनी उद्धव ठाकरेंचं तोंडभरुन कौतुक केले. (Uddhav Thackeray News)

महाविकास आघाडीने या मेळाव्यापासून प्रचाराची रणनीती बदलली आहे. या वेळेस मेळाव्याच्या भाषणाची सुरुवात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर चौफेर टीका केली. निवडणूक आयोग शुक्रवारी पत्रकार परिषद घेत आहे. त्यांनी महाराष्ट्रची निवडणूक सुद्धा जाहीर करावी. आमची तयारी झालेली आहे. विधानसभा निवडणूक एक महिना पुढे ढकलयचे काम सरकारकडून सुरु आहे. आपलं काम जनतेने विसरायला पाहिजे.

महाराष्ट्र धर्म रक्षणाची, स्वाभिमान रक्षणाची लढाई आहे. लढाई अशी लढाईची की एक तर तू राहशील नाहीतर मी राहील! होऊन जाऊ दे जे व्हायचे ते होऊन जाऊ दे अशा शब्दांत टीका केली. सत्ताधारी बघतायत डुबक्या मारून पवित्र होता येईल का? मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार तुम्ही तुमचा चेहरा जाहीर करा मी पाठींबा देतो. मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही जे नाव जाहीर कराल त्याला माझा पाठिंबा आहे, असे सांगत त्यांनी उपस्थित नेत्यांची मने जिंकली.

Varsha Gaikwad, Supriya Sule, Uddhav Thackeray
Uddha Thackeray : मोदींना आव्हान, फडणवीसांना इशारा अन् शिवसैनिकांना आदेश; उद्धव ठाकरे काय म्हणाले?

सुप्रिया सुळे यांनी केले कौतुक

शहाण्यानी कोर्टाची पायरी कधीच चढू नये. ही लढाई मशाल किंवा तुतारीची नाही तर तत्वाची लढाई आहे. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे उत्तर अधिकारी आहेत. तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांना दुखविण्याचा काम या लोकांनी केलं आहे. उद्धवजी बहीण म्हणून मी तुम्हाला शब्द देते, सर्वोच्च न्यायलायची लढाई आम्ही अर्धवट सोडणार नाही. उद्धवजी प्रेमाच नातं कधीही तुटणार नाही. शिवसेना ही कधीही वेगळी आहे हे असे वाटलं नाही. खेळीमेळीच्या वातावरणमध्ये काम केले आहे. आपण प्रयत्नशी पराकष्टा करू पण सरकार आपलं आणू. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

वर्षा गायकवाड यांनी केले तोंडभरून कौतुक

यावेळी सुप्रिया ताई म्हणाल्या की मुख्यमंत्री हा घरचा माणूसही होऊ शकतो. हे मला उद्धवजींसोबत काम केल्यावर कळले. सगळ्या मंडळींच्या तालमीत घडलो आहे. सुप्रिया सुळेनी सांगितले की केंद्रातले वातावरण बदललेले आहे कारण तिकडे ढगाळ वातावरण आहे. पहिले मोदी सरकार सांगायचे आता एनडीए सरकार म्हणतात. लेक लाडकी योजनेवर बोलत असतात. त्यामुळे महायुतीची जादू ओसरली आहे.

त्यासोबतच महाविकास आघाडीच्या महामेळाव्यात काँग्रेसचे नेते नसीम खान, बाळासाहेब थोरात यांनी देखील भाषणातून उद्धव ठाकरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

Varsha Gaikwad, Supriya Sule, Uddhav Thackeray
Sharad Pawar : राहुल गांधीच्या जागेवरून शरद पवार बोलले, 'धोका टळला नाही...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com