Bhagat Singh Koshyari Latest Marath
Bhagat Singh Koshyari Latest Marath Sarkarnama
देश

भगतसिंह कोश्यारी यांचे राज्यपाल पद धोक्यात?

सरकारनामा ब्यूरो

Bhagat Singh Koshyari : नवी दिल्ली : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आणि महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात खटके उडाले होते. विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या प्रलंबित यादीपासून ते शिंदे सरकारच्या स्थापनेपर्यंत राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेबाबत सर्वोच्च न्यायालयातही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. त्यामुळे कोश्यारी यांना दुसरी जबाबदारी देऊन त्यांना कार्यमुक्त केले जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे महाराष्ट्राचे राज्यपाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंह (Captain Amarinder Singh) यांनी आज केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि किरण रिजीजू यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच सिंह यांचा पंजाब लोक कॉंग्रेस पक्ष देखील भाजपमध्ये विलीन करण्यात आला. त्यामुळे आता भाजपला (BJP) कॅप्टन यांच्या रूपाने पंजाबमध्ये नवा चेहरा मिळाला. तीन कृषी कायद्याने पंजाबमध्ये पक्षाचे मोठे नुकसान झाले. ते भरून काढण्याची जबाबदारी कॅप्टन यांच्यावर भाजपने दिली आहे. कॅप्टन यांच्यावर महाराष्ट्राच्या राज्यपाल (Governor) पदाची जबाबदारी येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

अमरिंदर सिंह यांचे वय झाले आहे. तसेच त्यांना पाठीचा त्रास असल्याने पक्षाची मोठी जबाबदारी त्यांच्याकडे जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे त्यांना राज्यपालासारखे घटनात्मक पद दिले जाऊ शक्ते. त्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल मिळू शकते. तसेच कॅप्टन यांच्यासोबत प्रवेश केलेल्या इतर माजी आमदारांवर पक्ष संघटनेची जबाबदारी दिली जाणार आहे.

अमरिंदर सिंह यांच्या पक्षप्रवेशाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), भाजप प्रदेशाध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित राहतील. असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत कॅप्टन यांचा प्रवेश झाला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बोलताना कॅप्टन अरमिंदर सिंग म्हणाले, मी ५२ वर्षांपासून राजकारणात आहे. आमचा पंजाब बॉर्डरवर आहे. मी पाकिस्तानची भूमिका जवळून पाहिली. मात्र, पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी सीमेवरच्या परिस्थितीबाबत योग्य निर्णय घेतले. मी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे. पी. नड्ड यांचे आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT