अभिजित पाटलांचा पवारांसोबत यवतपर्यंत एकाच गाडीतून प्रवास; राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी मिळण्याची चर्चा

परतीच्या प्रवासाला निघताना शरद पवार यांनी स्वतः अभिजीत पाटील यांना आपल्या गाडीत बसण्याची सूचना केली.
Abhijit Patil-Sharad Pawar
Abhijit Patil-Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

पंढरपूर : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील (Abhijit Patil) आणि राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामध्ये मंगळवारी (ता. १९ सप्टेंबर) गुप्त चर्चा झाली. चर्चेचा तपशील मात्र समजू शकला नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अभिजीत पाटील यांची भेट झाल्याने पंढरपूरच्या (Pandharpur) राजकारणात मोठी खळबळ उडली आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी अभिजीत पाटील यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी देणार असल्याची विश्वासनीय सूत्रांची माहिती आहे. (Abhijit Patil's journey with Sharad Pawar in the same motor)

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके आणि कल्याणराव काळे यांचा पराभव करत एक हाती सत्ता मिळवली आहे. त्यानंतर त्यांनी अवघ्या दोनच महिन्यात दोन वर्षांपासून बंद असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरु करण्याचे जाहीर केले आहे. ऊस उत्पादकांचे थकीत असलेले ३० कोटी रुपयांचे ऊस बिलही पाटील यांनी वाटप केले आहे, त्यामुळे पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात अभिजीत पाटील यांचे स्थान अधिक बळकट झाले आहे.

Abhijit Patil-Sharad Pawar
भाजप प्रवेशाचा दावा होणाऱ्या अभिजित पाटलांची पवारांसमवेत राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला हजेरी

अभिजीत पाटील यांच्या कामाची तडफ आणि आगामी पंढरपूर विधानसभा निवडणुकीसाठी नवा चेहरा म्हणून राष्ट्रवादी काॅंग्रेसेने त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार कुर्डूवाडी येथे शेतकरी मेळाव्यासाठी आले होते. या कार्यक्रमाच्या व्यास पाठीवर अभिजीत पाटील यांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले होेते. व्यासपाठीवर शरद पवार आणि अभिजीत पाटील यांच्यात चर्चाही झाली.

Abhijit Patil-Sharad Pawar
Grampanchayat Election : आंबेगावात १४ ग्रामपंचायती जिंकून राष्ट्रवादीचे वर्चस्व राखले; मात्र शिंदे गटानेही खाते उघडले

कार्यक्रम संपल्यानंतर शरद पवार हे आमदार संजय शिंदे यांच्या टेंभूर्णी येथील फाॅर्महाऊसवर भोजनासाठी थांबले होते. त्याठिकाणीही अभिजीत पाटील यांना खास निमंत्रण देण्यात आले होते. भोजनानंतर शरद पवार आणि अभिजीत पाटील यांच्यात पंढरपूर तालुक्यातील राजकीय परिस्थिती आणि साखर कारखान्याच्या अडीअडचणी संदर्भात चर्चा झाली.

Abhijit Patil-Sharad Pawar
Grampanchyat Election : महाजनांना जळगावमध्येच धक्का : राष्ट्रवादी, शिवसेना, शिंदे गटाचे वर्चस्व; भाजप-काँग्रेसला भोपळा

परतीच्या प्रवासाला निघताना शरद पवार यांनी स्वतः अभिजीत पाटील यांना आपल्या गाडीत बसण्याची सूचना केली. त्यानुसार अभिजीत पाटील आणि शरद पवार एकाच गाडीत बसून यवतच्या दिशेने रवाना झाले. यवतपर्यंतच्या प्रवासादरम्यान शरद पवार आणि अभिजीत पाटील यांची गाडीत चर्चा झाली. चर्चा नेमकी कोणत्या विषयावर झाली, हे मात्र अद्याप समजू शकले नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजीत पाटील यांना राष्ट्रवादी पक्षाची मोठी जाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.

Abhijit Patil-Sharad Pawar
भोरमध्ये राष्ट्रवादीचा थोपटेंना धक्का; सरपंचपदासह दोन्ही ग्रामपंचायतींवर फडकवला झेंडा

आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपुरात राष्ट्रवादीला मरगळ आली आहे, त्यामुळे पक्षाला पंढरपूर तालुक्यात खमक्या नेतृत्वाची गरज आहे. ती अभिजीत पाटील यांच्या रुपाने पूर्ण होऊ शकते, अशी आशा राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याना आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून अभिजीत पाटील यांच्या नावाची आतापासूनच चर्चा सुरु झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com