Mahua Moitra Sarkarnama
देश

Mahua Moitra : खासदारकी वाचवण्यासाठी महुआ मोईत्रा ॲक्शन मोडवर; सर्वोच्च न्यायालयात याचिका

Supreme Court : मोईत्रा यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

Anand Surwase

Lok Sabha : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आले आहे. या कारवाई विरोधात आता मोईत्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मोईत्रा यांनी पैसे घेऊन प्रश्न विचारला असल्याचा आरोप भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केला होता. मात्र महुआ मोइत्रा यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान (Parliament Winter Session) 8 डिसेंबर रोजी मोईत्रा यांचे लोकसभेचे (Lok Sabha) सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. खासदार दुबे यांनी मोईत्रा यांच्यावर सभागृहात प्रश्न विचारण्यासाठी उद्योजक दर्शन हिरानंदानी (Darshan Hiranandani) यांच्याकडून पैसे आणि काही भेटवस्तू घेतल्याचा आरोप केला होता. तसेच महुआ यांनी अदानी समुहाच्या विरोधात प्रश्न उपस्थित करण्यासाठी संसदेचे लॉगिन पासवर्ड शेअर केल्याचाही आरोप करण्यात आला होता. (Cash for Query Case)

महुआ यांनी 50 प्रश्न हिरानंदानी यांच्या सांगण्यावरून विचारण्यात आल्याचा आरोप दुबे यांनी केला होता. त्यावर चौकशीअंती संसदेच्या शिस्तपालन समितीने महुआ मोईत्रा यांना दोषी ठरवत बडतर्फीची कारवाई करण्याचे निर्देशित केले होते. त्यानंतर संसदेत आवाजी मतदानाने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या कारवाईनंतर तृणमूलच्या नेत्या मोईत्रा यांनी सर्व आरोप फेटाळून लावताना समितीने कोणताही पुरावे नसताना निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय दिला आहे. विरोधकांना गप्प बसवण्यासाठी समितीचा वापर केला जात आहे. तसेच या समितीने सर्व नियम धाब्यावर बसवून ही कारवाई केली असल्याचा आरोपही केला. याचबरोबर या कारवाई प्रकरणी मला माझी बाजू मांडण्याची संधीच देण्यात आली नसल्याचे महुआ यांनी म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणी राजकीय आणि कायदेशीर लढा लढणार असल्याचे मोइत्रा यांनी स्पष्ट केले होते.

दरम्यान, महुआ यांना समितीने 2 डिसेंबर रोजी चौकशीसाठी उपस्थिती लावण्यास सांगितले होते. त्यावेळी समितीकडून चुकीच्या पद्धतीने प्रश्न विचारले जात असल्याचा आरोप करत महुआ चौकशी अर्धवट सोडून बाहेर आल्या होत्या. त्यावेळी चौकशी समितीचे सदस्य दानिश अली यांनी देखील महुआ यांच्या आरोपाचे समर्थन केले होते. आता लोकसभा अध्यक्षांनी केलेल्या या निलंबनाच्या कारवाई विरोधात महुआ यांनी सर्वोच्च न्यायालायात आव्हान दिले आहे. लोकसभा अध्यक्षांनी केलेल्या निलंबनाच्या कारवाई विरोधात न्याय मागण्यासाठी महुआ यांनी सर्वोच्च न्यायालयात आपली याचिका दाखल केली आहे.

(Edited By - Rajanand More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT