Lok Sabha Election : डीके शिवकुमार लागले कामाला; प्रसिध्द अभिनेत्याला दिली खासदारकीची ऑफर

Shiva Rajkumar : शिवा राजकुमार हे प्रसिध्द कन्नड अभिनेते आहेत.
Shiva Rajkumar, DK Shivakumar
Shiva Rajkumar, DK ShivakumarSarkarnama
Published on
Updated on

D. K. Shivakumar : काँग्रेसचे नेते व कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी प्रसिध्द कन्नड अभिनेता शिवा राजकुमार यांना खासदारकीची ऑफर दिली आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाकडून तिकीट देण्याचे त्यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितले आहे. दरम्यान, शिवकुमार यांची ही ऑफर राजकुमार यांनी मान्य केलेली नाही. त्यांनी आपण राजकारणात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

शिवकुमार हे काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखले जातात. राज्यात पक्षाला सत्ता मिळवून दिल्यानंतर आता ते लोकसभेच्या (Lok Sabha Election) तयारीला लागले आहेत. बेंगलुरू येथील एका कार्यक्रमात शिवकुमार यांनी राजकुमार (Shiva Rajkumar) यांना ही ऑफर दिली आहे. संसदेत (Parliament) प्रवेश करण्याची संधी प्रत्येकाला अशी सहज मिळत नाही. तुमच्या दरवाजावर चालून आलेली ही संधी सोडू नका. निवडणुकीसाठी (Election) तयारी करा, असे मी शिवा राजकुमार यांना सांगितले होते. तुम्ही चित्रपटात वाटेल तेव्हा काम करू शकता. पण अशी संधी प्रत्येकाला मिळत नाही, असे शिवकुमार म्हणाल होते.

Shiva Rajkumar, DK Shivakumar
IT Raid : खासदाराच्या कारनाम्यांनी देश चक्रावला; आतापर्यंतची सर्वात मोठी रेड, 350 कोटींचा आकडा ओलांडला

शिवा राजकुमार हे कर्नाटकातील प्रसिध्द अभिनेते असून भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महान अभिनेते डॉ. राजकुमार यांचे ते पुत्र आहेत. त्यांनी शिवकुमार यांची ऑफर स्वीकारण्यास नकार दिला आहे. माझ्या वडिलांनी मला अभिनय करून तुम्हा सर्वांना खुश ठेवण्याचे गिफ्ट दिले आहे. तिथपर्यंतच माझी झेप आहे. मी तुमच्यासोबतच राहून अभिनय करेन. राजकारणासाठी काही लोक असून ते चांगले काम करत आहेत, असे म्हणत शिवा राजकुमार यांनी ऑफर धुडकावली.

राजकुमार यांची पत्नी गीता शिवाराजकुमार यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्या माजी मुख्यमंत्री एस. बंगारप्पा यांच्या कन्या आहेत. त्यांचे बंधु मधु बंगारप्पा हे शिक्षणमंत्री आहे. या दोघांनीही आपल्याला राजकारणात येण्यासाठी कधीही प्रेरित केलेले नाही, असेही त्यांनी सांगितले.

(Edited By - Rajanand More)

Shiva Rajkumar, DK Shivakumar
Rajya Sabha : जगदीप धनखड यांनी 70 वर्षांनंतर बदलली नमाजाची वेळ; कामकाजाच्या वेळेत मोठा बदल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com