Congress Caste Census Sarkarnama
देश

Caste Census News : 'इंडिया' आघाडी करणार भाजपची कोंडी; लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसची मोठी घोषणा

Congress Caste Census News : बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेचे आकडे जाहीर झाल्यानंतर त्यावरून राजकारण तापले आहे.

Amol Jaybhaye

Pawan Khera News : बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेचे आकडे जाहीर झाल्यानंतर त्यावरून राजकारण तापले आहे. जातनिहाय जनगणनेवरून विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीकडून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बिहारनंतर आता काँग्रेसशासित राज्यांमध्ये जातनिहाय जनगणना करण्यात येणार असल्याची घोषणा पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा विरोधकांकडून तापवला जाण्याची शक्यता आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी शुक्रवारी राज्यात जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेडा यांनी शनिवारी प्रतिक्रिया दिली. उदयपूरमध्ये ते म्हणाले, 'राहुल गांधींनी एप्रिल 2023 मध्ये देशात जातनिहाय जनगणना व्हायला हवी, असे म्हटले होते. कारण संख्या जाणून घेतल्याशिवाय तुम्ही योजना कशा बनवू शकता, असा सवाल त्यांनी केला. तसेच सर्व काँग्रेसशासित राज्यांमध्ये जातीवर आधारित सर्वेक्षण केले जाईल, असेही स्पष्ट केले.

गेहलोत यांनी निवडणुकीनंतर राजस्थानमध्ये जातनिहाय जनगणना करणार असल्याचे जाहीर केले. काँग्रेस (Congress) नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांनीही छत्तीसगडमध्येही (Chhattisgarh) याची घोषणा केली. शुक्रवारी काँग्रेसच्या वॉर रूममध्ये जातनिहाय जनगणनेवर चर्चा झाली. त्यामुळे हा मुद्दा या वर्षाअखेरीस निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये काँग्रेसकडून निवडणुकीची रणनीती म्हणून वापरला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राजस्थान सरकार बिहारप्रमाणेच जात आधारित जनगणना करणार आहे. गेहलोत म्हणाले, 'राहुल गांधी (Rahul Gandhi) पुन्हा पुन्हा सांगत आहेत, लोकसंख्येच्या प्रमाणात सहभाग असायला हवा. ही संकल्पना आम्ही पुढे नेऊ. त्यामुळे पक्षाचा निर्णय लक्षात घेऊन राजस्थान सरकारने या मोहिमेची घोषणा करावी, असे आम्ही ठरवले आहे. देशात विविध जाती आहेत. वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात, त्यामुळे प्रत्येक जातीची लोकसंख्या किती आहे हे जर आपल्याला कळले तर आपल्याला जातीनुसार नियोजन करणे सोपे जाईल.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT